ग्रीन यादीत जिल्ह्यातील ४६ हजार शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 10:18 PM2017-12-13T22:18:30+5:302017-12-13T22:19:23+5:30
दोन दिवसांपूर्वी बँकेने जिल्ह्यातील ३९ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने कर्जमाफीच्या ग्रीन यादीत ४६ हजार २८३ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आल्याचे जाहीर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दोन दिवसांपूर्वी बँकेने जिल्ह्यातील ३९ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने कर्जमाफीच्या ग्रीन यादीत ४६ हजार २८३ शेतकºयांचा समावेश करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे ऐवढ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी शासन विविध योजना, उपक्र म व अभियान राबवित आहे. विविध प्रयोग शेतीत करून शेतकºयांची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. बहुतांश शेती ही वरथेंबी पाण्यावर अवलंबून आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटातील शेतकऱ्यांना कर्जाच्या जोखडातून मुक्त करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण निर्णय घेवून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून केली आहे.
कर्जमाफी योजनेतंर्गत जिल्ह्यातील ४६ हजार २८३ शेतकऱ्यांचा ग्रीन यादीत समावेश करण्यात आला आहे. १४ हजार २२ शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. तर ३ हजार ९५ शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे १ एप्रिल २०१९ ते ३० जून २०१६ पर्यंतच्या दीड लाख रूपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ होणार आहे. ज्या शेतकºयांनी सन २०१५-१६ व सन २०१६-१७ या कालावधीमध्ये पिक कर्जाची विहीत मुदतीत कर्जफेड केली आहे.
अशा शेतकºयांना घेतलेल्या कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजार रुपये यापैकी कमी असलेल्या रक्कमेचा प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. पात्र शेतकºयांना योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही प्रक्रि या सुरूच राहणार आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही मुख्यत: शेतीवर अवलंबून आहे. शेतीसाठी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी आणि पिकांची लावणी व कापणी करण्यासाठी खर्च येत असल्यामुळे शेतकरी बँकांचे कर्ज घेतात. कधी अतिवृष्टी, गारपीट, वादळ, रोगराई, तर कधी दुष्काळी स्थितीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
१३१ बँक शाखेतून प्रक्रिया
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३१ शाखा, विदर्भ-कोकण ग्रामीण विकास बँकेच्या २२ शाखा आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या ७८ शाखा अशा एकूण १३१ बँक शाखेतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत आहे.
उर्वरित २७ हजार शेतकऱ्यांचे काय
सुरूवातीला बँका आणि सहकार निबंधक कार्यालयाने जिल्ह्यातील ७३ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र यापैकी अंतीम: केवळ ४६ हजार शेतकरी पात्र ठरल्याचे जाहीर केले. त्यामुळे उर्वरित २७ हजार शेतकऱ्यांचे काय असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.