गुडघ्याएवढ्या लेकरांची व्यथा बघा; २१६ अंगणवाड्यांत शौचालय नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 04:03 PM2024-05-17T16:03:43+5:302024-05-17T16:04:59+5:30

३९८ अंगणवाड्या पाणीविना : चिमुकल्यांसह सेविका व मदतनिसांची कुचंबणा

There are no toilets in 216 Anganwads | गुडघ्याएवढ्या लेकरांची व्यथा बघा; २१६ अंगणवाड्यांत शौचालय नाही

There are no toilets in 216 Anganwads

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
ग्रामीण भागातील चिमुकल्यांना 'अ, आ, इ, ई' गिरविता यावे याकरिता शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आले. यानुसार जिल्ह्यात १७२४ अंगणवाडी केंद्र उभारण्यात आले. मात्र, तेथील सुविधांकडे शासनाचे सपशेल दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. कारण आजही जिल्ह्यातील २१६ अंगणवाड्यांमध्ये शौचालय, तर ३९८ अंगणवाड्यांमध्ये पाण्याची सुविधा नाही.


आजघडीला जिल्ह्यातील प्रत्येकच गाव गोदरीमुक्त झाले आहे. गावागावांत हगणदारीमुक्त गाव म्हणून फलकही लावण्यात आले. मात्र, अद्यापही काही गावांतील २१६ अंगणवाड्यांमध्ये शौचालयांची निर्मितीच करण्यात आली नाही. त्यामुळे तेथे येणाऱ्या चिमुकल्यांसह सेविका व मदतनिसांची कुचंबणा होत आहे. त्यात धक्कादायक बाब म्हणजे तब्बल ३९८ अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली नाही. या अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून स्तनदा-गरोदर मातांसह लहान मुले व किशोरवयीन मुलींना पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. आजघडीला जिल्ह्यात १७२४ अंगणवाडी केंद्र मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी काही अंगणवाड्या एकाच इमारतीत असून, काही अंगणवाड्यांची स्वतःची इमारत नसल्याची माहिती आहे. यातील २१६ अंगणवाडी केंद्रात शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातही बऱ्याच केंद्रातील शौचालय उपयोगाच्या कामी नाही.


बाहेरून आणावे लागते पाणी
जिल्ह्यातील ३९८ अंगण- वाड्यांत पाण्याची व्यवस्था नसल्याची माहिती असून, येथील अंगणवाडी मदत- निसाला बाहेरून पाणी आणावे लागत असल्याचे दिसून येते. तर चिमुकल्यांना घरूनच पाणी सोबत घेऊन यावे लागते. त्यामुळे या चिमुकल्यांना नाहकच त्रास सहन करावा
लागतो. तेव्हा शासन-प्रशासनाकडून याकडे लक्ष देत प्रत्येकच अंगणवाडी केंद्रात शौचालयासह पाण्याची सोय करावी, अशी मागणी आता होत आहे.
ज्वालक
 

Web Title: There are no toilets in 216 Anganwads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.