दोन वर्षांपासून तंटामुक्त गावांची घोषणाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:26 AM2021-04-19T04:26:12+5:302021-04-19T04:26:12+5:30
गोंदिया : गावात शांतता निर्माण करुन गावातील तंट्याचे गावातच निवारण महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला सध्या उतरती कळा लागली ...
गोंदिया : गावात शांतता निर्माण करुन गावातील तंट्याचे गावातच निवारण महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला सध्या उतरती कळा लागली आहे. या मोहिमेकडे शासनाचे दुर्लक्ष झाले असून, मागील दाेन वर्षांपासून तंटामुक्त गावांची घोषणाच झाली नाही.
राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतून गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखून गावातील अवैध धंधाना आळा घालणे. अवैध धंदे करणाऱ्यांना सन्मानाच्या रोजगाराकडे वळविणे, क्षुल्लक वादाचे पर्यावसान मोठ्या वादात होऊ नये, स्त्रीभ्रूणहत्येवर आळा घालणे, कन्यारत्न जन्मानंद भेट, मुलींना तंटामुक्त गाव मोहीम आघाडी मोठ्या वादात होऊ नये, गाव जन्म देणाऱ्या मातांचा गौरव, नवविवाहित मुलींना माहेरभेट, जातीय सलोखा राखणे, गाड्यातूनच तंट्याचा निपटारा करणे, हुंडाबंदी करण्यात आली. आंतरजातीय विवाह घडवून आणला. समाजातील अनिष्ट चालीरिती व परंपरा यावर आळा घातला. सण, उत्सव, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, विधवा, परित्यक्ता यांना मदत, वृक्षारोपण करण्यात आले. तंटामुक्त मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करून राज्यातील १९ हजारांपेक्षा अधिक गावांनी शांततेच्या मार्गाने गावाचा विकास करण्यावर या योजनेच्या माध्यमातून भर देण्यात आला. सन २०१५-१६ ते सन २०१९-२० या पाच वर्षांतील तंटामुक्त गावांची घोषणाच झाली नाही. सन २००७ मध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी या मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेतून महाराष्ट्रात शांततेची गंगा वाहात होती, परंतु फडणवीस सरकार सत्तेत येताच, या मोहिमेकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता महाविकास आघाडी सरकारही कोरोनात गुरफटलेली असल्याने, या मोहिमेकडे दुर्लक्ष करण्यात आले. गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडवून राज्यातील १० लाखांवरील तंटे सामोपचाराने सोडविणारी तंटामुक्त मोहीम आज अश्रू ढासळत आहे.
बॉक्स
मोहीम ढाळत आहे अश्रू
न्यायालय व पोलिसांच्या कामाचा तान कमी करण्यासाठी तंटामुक्त मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेला वृद्धिगंत करण्यापेक्षा त्या मोहिमेकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे तंटामुक्त मोहीम अश्रू ढाळत आहे. महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.