पर्यावरण रक्षणासाठी मनुष्याने आपल्या सवयी बदलविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2017 12:27 AM2017-06-17T00:27:42+5:302017-06-17T00:27:42+5:30

मनुष्याने निसर्गाला फार हानी पोहचवलेली आहे. त्याचेच वाईट परिणाम आज दिसून येत आहे.

There is a need for a person to change his habits for environmental protection | पर्यावरण रक्षणासाठी मनुष्याने आपल्या सवयी बदलविण्याची गरज

पर्यावरण रक्षणासाठी मनुष्याने आपल्या सवयी बदलविण्याची गरज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मनुष्याने निसर्गाला फार हानी पोहचवलेली आहे. त्याचेच वाईट परिणाम आज दिसून येत आहे. कोणत्याही गोष्टीचा अति गैरवापर करणे नुकसानकारकच ठरते. आज मानवाने आपल्या जीवनात प्लास्टिकचा एवढा वापर केला आहे की, मानवी जीवनावर प्लास्टिकचे साम्राज्य निर्माण केले आहे. प्लास्टिक रस्त्यावर टाकल्यामुळे ते गाई-म्हशी सेवन करतात व त्यापासून मिळणाऱ्या दुधाचा मानव वापर करतात व त्यामुळे मानवाच्या जीवनावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखावयाचा असेल तर मानवाने आपल्या सवयीमध्ये बदल करावयास पाहिजे. सध्याच्या युगामध्ये वातानुकुलित यंत्राचा वापर फार जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. परंतू एसीमुळे निघालेल्या वायुचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखावयाचा असेल तर मानवाने आपल्या सवयीमध्ये बदल करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व जिल्हा वकील संघाच्या संयुक्तवतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजीत कायदेविषयक साक्षरता शिबिराच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष टी.बी.कटरे, वन अधिकारी बडगे, सह दिवाणी न्यायाधीश पी.बी.भोसले, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, वनसंरक्षक मेश्राम, पीएलव्ही आशा ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष कटरे यांनी, जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना १९७२ पासून अस्तित्वात आली. पर्यावरण चांगले राहण्यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. पर्यावरणाकरीता आपण स्वत:च्या घरापासून सुरुवात करावी असे सांगितले. वन अधिकारी बडगे यांनी, पर्यावरण म्हणजे मानवासोबत सजीवसृष्टी, आजुबाजूचे वातावरण, एकमेकांशी होणारी क्रि या होय. बाहेरचे तापमान वाढते तेव्हा माणूस बेचैन होते. प्रदूषणाविषयी कायदे इंदिरा गांधी यांनी आमलात आणले असे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद, सह दिवाणी न्यायाधीश भोसले व अतिरिक्त जिल्हाधिकारी मोहिते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्र मास वनसंरक्षक मेश्राम, जिल्हा न्यायालय वकील संघाचे सदस्य, जिल्हा विधी सेवा समितीचे सदस्य, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात उपवनसंरक्षक युवराज यांनी स्वच्छ हवा व पाणी मिळण्याकरीता वृक्षारोपण करणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगितले. आभार सहायक उपवनसंरक्षक यु.टी.बिसेन यांनी मानले.

Web Title: There is a need for a person to change his habits for environmental protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.