जीवनात यश प्राप्तीसाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 06:00 AM2020-01-29T06:00:00+5:302020-01-29T06:00:30+5:30

सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती व क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या छायाचित्रांचे पूजन व दिपप्रज्वलन करुन मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. पुढे बोलताना, आमदार चंद्रिकापुरे यांनी, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यामधील नाते त्रिसुत्रीय आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचे व पालकांचे परीक्षण करणे गरजेचे आहे. पाल्यांना संवेदनशिलतेने बोलते करा. त्यांच्या समस्या जाणून घ्या.

There is no alternative to education for success in life | जीवनात यश प्राप्तीसाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाहीच

जीवनात यश प्राप्तीसाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाहीच

Next
ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : आश्रमशाळेत विद्यार्थी, शिक्षक व पालक मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा-कोयलारी : आजच्या विज्ञान युगात शिक्षण अतिमहत्वाचे आहे. डॉ. बाबासाहेबांचे नाव शिक्षणामुळेच जगभरात नावारुपास आले. शिक्षणातूनच वृत्तपत्र विकणाऱ्या डॉ. अब्दुल कलाम यांना शास्त्रज्ञापासून राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारता आली. शिक्षणाशिवाय आपण काहीच करु शकत नाही. जीवनात यश प्राप्तीसाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
शासकीय आश्रमशाळेत आयोजित विद्यार्थी, शिक्षक व पालक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सरीता कापगते होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सडक-अर्जुनीचे नगराध्यक्ष देवचंद तरोणे, पं.स.सदस्य गीता टेंभरे, प्राचार्य प्रकाश धोटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष छत्रपाल परतेकी, उपाध्यक्ष मालता उईके, पोलीस पाटील रविता उईके, सरपंच मोहनलाल बोरकर, आनंद इळपाते, पवन टेकाम, कृपासागर जनबंधू, रजनी दशरिया, चंद्रमुनी बंसोड, मुख्याध्यापक एच.के.किरणापुरे, मंगल वैद्य, यशवंत सलामे, भोंगाडे, अनिल पंधरे, राष्ट्रवादी विद्यार्थी परिषद अध्यक्ष आशिष येरणे उपस्थित होते.
सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती व क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या छायाचित्रांचे पूजन व दिपप्रज्वलन करुन मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. पुढे बोलताना, आमदार चंद्रिकापुरे यांनी, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यामधील नाते त्रिसुत्रीय आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचे व पालकांचे परीक्षण करणे गरजेचे आहे. पाल्यांना संवेदनशिलतेने बोलते करा. त्यांच्या समस्या जाणून घ्या. त्यांच्याकडून केवळ परीक्षेतील गुणांची अपेक्षा न करता त्यांच्या आवडीनिवडीच्या क्षेत्राला प्राधान्य द्या. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी सुद्धा भविष्याचा विचार करुन शिक्षणालाच प्रथम प्राधान्य देणे काळाची गरज आहे असा मोलाचा सल्लाही दिला.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक विंचूरकर यांनी, कुष्ठरोग व क्षयरोगावर विस्तृृत माहिती दिली. डॉ. प्रकाश धोटे यांनी, अंधश्रद्धा निर्मूलनावर भाष्य करुन प्रात्यक्षिक करुन दाखविले. जि.प.सदस्य सरीता कापगते यांनी, आदिवासी समाजाचा विकास घडवून आणायचा असेल तर शिक्षणाला प्राधान्य द्या. शिक्षण म्हणजे कधीही न संपणारी शिदोरी आहे. आदिवासींच्या सर्वागिण विकासाकरीता शासनाकडून सर्वतोपरी उपाय केले जात असल्याचे सांगीतले. सामाजिक कार्यकर्ता पवन टेकाम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी क्रिडा शिक्षक के.बी.चव्हाण यांनी विद्यार्थ्याकरवी अप्रिय लेझीम सादर केली. प्रास्ताविक मुख्याध्यापक एच.के.किरणापुरे यांनी मांडले. संचालन शिक्षिका आर.व्ही.ब्राम्हणकर यांनी केले. आभार प्रा.के.के.पारधी यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Web Title: There is no alternative to education for success in life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.