ग्रंथासारखा दुसरा श्रेष्ठ मित्र नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2016 02:15 AM2016-01-16T02:15:38+5:302016-01-16T02:15:38+5:30
ग्रंथासारखा दुसरा श्रेष्ठ मित्र नाही. हे नाते लक्षात घेवून युवकांनी आपला जास्तीत जास्त वेळ ग्रंथालयासारख्या ज्ञानमंदिरात घालवावा.
गिरीश गुभरे यांचे मत : युवा सप्ताहानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाची सांगता
चिचगड : ग्रंथासारखा दुसरा श्रेष्ठ मित्र नाही. हे नाते लक्षात घेवून युवकांनी आपला जास्तीत जास्त वेळ ग्रंथालयासारख्या ज्ञानमंदिरात घालवावा. थोरामोठ्यांच्या चरित्रांसह स्पर्धा परीक्षांच्या पुस्ताकांचे वाचन करावे, असे विचार आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक गिरीश गुबरे यांनी व्यक्त केले.
युवा सप्ताहानिमित्त बुधवारी जिजामाता सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिक्षण महर्षी बापूसाहेब लाखणीकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.
अध्यक्षस्थानी शैलेश जैन होते. अतिथी म्हणून के.बी. देशकर, देशकर, डोंगरे, नीलकंठ सलामे, आनंदराव फुलसुंगे, रामेश्वर सिडाम, राजकुमार ढेंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन जितेंद्र रहांगडाले यांनी तर प्रास्ताविक सुरेश गिऱ्हेपुंजे यांनी केले. आभार सुजाता डोंगरे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी ग्रंथपाल वनिता निखाडे, प्रिया कटकवार, गिरीश राऊत, फारूक शेख, जयेंद्र राऊत, शिद्दिक शेख आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)