जप्त केलेला माल ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही; कचऱ्याच्या सानिध्यात कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:27 AM2021-03-21T04:27:55+5:302021-03-21T04:27:55+5:30
नरेश रहिले गोंदिया : जिल्ह्यात गुटखाबंदी आहे, मात्र सर्वत्र गुटखा विक्री केला जात आहे. या गुटखा विक्रेत्यांवर ...
नरेश रहिले
गोंदिया : जिल्ह्यात गुटखाबंदी आहे, मात्र सर्वत्र गुटखा विक्री केला जात आहे. या गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत नाही. काही मोजक्याच गुटखा साठेबाजांवर कारवाई करण्यात येत आहे. गुटखाबंदी असल्यामुळे याच मालावर मोठ्या प्रमाणात पैसे या कमविता येत असल्यामुळे या बंद असलेल्या गुटख्याचा गोरखधंदा गोंदिया जिल्ह्यात सुरू आहे. जागोजागी, चौकाचौकात पानटपरी चालकांकडून हा गुटखा मिळतो. जिल्ह्यात गुटखा जप्त केला तरी तो गुटखा साठवून ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विाभागाकडे जागाच नाही. भाड्याच्या खोलीतूनच आठवड्यातून दोनच दिवस हे कार्यालय चालवावे लागते. गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत आहे. या गुटखा विक्रीवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाली तर गुटखा ठेवायचा कुठे हा प्रश्न इतरांना पडतो.
......
बॉक्स
जागा ठेवण्यासाठी जागा नाही
१) गोंदियाच्या बसंतनगरात असलेले कार्यालय हे छोट्याशा जागेत असल्याने त्या कार्यालयात जप्त केलेला माल साठवून ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही.
२) भाड्याने असलेल्या या कार्यालयात गोदामाची व्यवस्था पाहिजे होती, परंतु त्या ठिकाणी जप्त केलेल्या मालासाठी गोदामाची व्यवस्था नाही.
३) बसंतनगरातील कार्यालय धुळीच्या साम्राज्यात आहे. त्या ठिकाणी बसण्यासाठी जागा अपुरी पडते. त्यात माल ठेवण्यासाठी जागाच नाही.
..................................
बॉक्स
वर्षभरात जप्त केलेला गुटखा
१) सन २०२० मध्ये अडीच लाखांचा गुटखा गोंदिया जिल्ह्यात जप्त करण्यात आला आहे. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात कारवाई करण्यात आली.
२) गोंदिया जिल्हा मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्याला व छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्याला लागून आहे. गोंदिया जिल्ह्यात येणारा गुटखा रेल्वेच्या मार्गाने तसेच खासगी वाहनातून गोंदियात येतो.
३ गोंदियाच्या रेल्वेस्टेशन, बसस्थानक परिसरात, शहरातील सिव्हिल लाईन, बाजार परिसरातील पानटपरीवर गुटखा जप्त करण्यात आला.
........................
अन्न व औषध विभागाने २०२० मध्ये केलेल्या कारवाया
जानेवारी-००
फेब्रुवारी-
मार्च-
एप्रिल-०३
मे-०२
जून-०२
जुलै-००
ऑगस्ट-००
सप्टेंबर-००
ऑक्टोंबर-००
नोव्हेंबर-०२
डिसेंबर-०१
..........
कोट
गोंदियाच्या रेल्वेस्टेशन, बसस्थानक परिसरात, शहरातील सिव्हिल लाईन, बाजार परिसरातील पानटपरीवर गुटखा सहजरित्या उपलब्ध होतो. त्या गुटख्यासाठी कुणाला भटकावे लागत नाही सहजरित्या तो गुटखा लोकांना मिळतो. या वर्षात आमच्या विभागाकडून दहा कारवाया करण्यात आल्या. त्या नऊ जणांविरुध्द संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
- शीतल देशपांडे, अन्न सुरक्षा अधिकारी