लोकशाहीच्या माध्यमातून परिवर्तन झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 01:15 AM2017-11-26T01:15:25+5:302017-11-26T01:15:41+5:30

There was a change through democracy | लोकशाहीच्या माध्यमातून परिवर्तन झाले

लोकशाहीच्या माध्यमातून परिवर्तन झाले

Next
ठळक मुद्देसुरक्षा दौड पारितोषिक वितरण : शेकडो खेळाडूंचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : विचारातून परिवर्तन घडू शकते. परंतु विचार करुन विचार मांडण्याची संधी मिळावी लागते भारत देशात ही संधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधाना अंतर्गत लोकशाहीच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली. म्हणूनच या लोकशाहीच्या माध्यमातून परिवर्तन घडून आले. असे विचार पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सुरक्षा दौड पारितोषिक वितरण कार्यक्रमात व्यक्त केले.
गोंदिया जिल्हा पोलीस विभागाअंतर्गत नक्षलग्रस्त क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्याचे खेळांमधील करीयर घडविण्यासाठी आयोजित सुरक्षा दौड स्पर्धेचा पारितोषीक वितरण सोहळा पांढरवाणी रोडवरील मैदानात घेण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अतिरीक्त पोलीस अधीक्षक संदीप आठवले, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, पं. स. सभापती कविता रंगारी, पं.स.सदस्य राजेश कठाणे, शेषराव गिºहेपुंजे, तहसीलदार व्ही.एम.परळीकर, सरपंच डी. यु. रहांगडाले उपस्थित होते.
बडोले म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यानी क्रांतीकारी बिरसा मुंडा यांचा आदर्श डोळयासमोर ठेवूृन पुढे जाण्याचे स्वप्न पहावी गोंदिया जिल्ह्यातील पोलीस विभागाकडून अतिशय चांगला कार्यक्रम घेण्यात आला. याबद्दल त्यांनी पोलीस विभागाचे कौतुक केले.
पाटील भुजबळ यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील ६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी या सुरक्षा दौड स्पर्धेमध्ये भाग घेतला. सडक-अर्जुनी तालुक्यातील १४८ (१४८) विद्यार्थ्यानी भाग घेतला. ज्या विद्यार्थ्याना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला.अशा विद्यार्थ्याना गोल्ड मेडल, सिल्वर व कास्यं पदक देऊन सन्मानित करण्यात येईल. पुढे २९ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग घेता येणार असल्याचे सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले.
सुरक्षा दौड स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्याना पदक व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर पर्वते यांनी केले. संचालन ए.पी.मेश्राम यांनी केले तर आभार ठाणेदार पर्वते यांनी मानले.

Web Title: There was a change through democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.