खडकी डोंगरगाव येथे होते नागपंचमीला भाविकांची गर्दी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:32 AM2021-08-13T04:32:48+5:302021-08-13T04:32:48+5:30
प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील पूर्व दिशेला खडकी (डोंगरगाव) हे पहाडावरती वसलेले आहे. या खडकी व डोंगरगाव या दोन गावांची ...
प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील पूर्व दिशेला खडकी (डोंगरगाव) हे पहाडावरती वसलेले आहे. या खडकी व डोंगरगाव या दोन गावांची सीमा एकत्र लागून असल्याने दोन्ही गाव एकत्रच वसलेले आहे. वीस वर्षांपूर्वी आंबेतलाव येथे बैलाचा शंभरपट भरत असे. त्यावेळी तिरोडा येथील महेश असाटीची बैलाची जोडी शंकर पटाच्या दानीला न जाता ती जोडी दान सोडून जात होती. त्यामुळे गावातील एका इसमाने सांगितले की या पहाडीच्या ठिकाणी नागमंदिर आहे. त्या नाग मंदिराला पूजा करुन माझी जोडी दानीला जावू अशी प्रार्थना असाटी यांनी त्या मंदिरामध्ये जावून पूजा-अर्चना करुन केल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून या नाग मंदिरामध्ये नागमपंचमीच्या दिवशी पूजा-अर्चना होते. नागपंचमीच्या दिवशी या ठिकाणी पूजा-अर्चना व दहीकाला करुन पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी त्या ठिकाणी समितीच्यावतीने पूजा-अर्चना व दहीकाला करुन महाप्रसादाचे वितरण केले जाते.