संसर्गात होतेय वाढ,ॲक्टिव्ह झाले पाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:35 AM2021-09-04T04:35:04+5:302021-09-04T04:35:04+5:30
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शुक्रवारी (दि. ३) २४९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १८६ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ६३ नमुन्यांची रॅपिड ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शुक्रवारी (दि. ३) २४९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १८६ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ६३ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एक नमुना कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.४ टक्के आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४४७५६० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २२८१७७ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१९३८३ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ४१२०५ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले तर ४०४९६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
............
सणासुदीच्या दिवसात घ्या काळजी
जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू काही नागरिक पुन्हा बिनधास्त वागू लागले आहे. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. या सणासुदीला सुरुवात झाली आहे. हे सण, उत्सव सुरळीतपणे पार पाडणे नागरिकांच्याच हातात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्यात गरज आहे.
............