कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्रात चौरंगी लढत होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 10:09 PM2021-12-05T22:09:18+5:302021-12-05T22:09:40+5:30
तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्र असून नामाप्र असल्याने या जिल्हा परिषद क्षेत्राची चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोणत्याही राजकीय पक्षाची आघाडी दिसून येत नसल्याने सध्या भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि प्रहार ही चारही पक्ष आपापले स्वतंत्र उमेदवार निवडणुकीत उभे करण्याच्या तयारीत असल्याने ही लढत चारही पक्षांच्या उमेदवारांमध्ये होणार हे निश्चित. यात काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंडीकोटा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अद्यापही युती किवा आघाडी यासंदर्भात कुठलाच निर्णय झालेला नाही. त्यातच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी एकला चलो रे चा सूर सुरुवातीपासूनच आवळा आहे. त्यामुळे काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढतीचे चित्र दिसून आहे. तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा जि. प. क्षेत्र नामाप्र असल्याने या जि. प. क्षेत्रात चांगलीच लढत होणार असून चौरंगी लढत होणार असल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे.
तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्र असून नामाप्र असल्याने या जिल्हा परिषद क्षेत्राची चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोणत्याही राजकीय पक्षाची आघाडी दिसून येत नसल्याने सध्या भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि प्रहार ही चारही पक्ष आपापले स्वतंत्र उमेदवार निवडणुकीत उभे करण्याच्या तयारीत असल्याने ही लढत चारही पक्षांच्या उमेदवारांमध्ये होणार हे निश्चित. यात काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. कवलेवाडा क्षेत्राकरीता सर्व राजकीय पक्ष स्वतंत्रपणे आपापली उमेदवार रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहे. पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागल्याने दिसून येत आहे. विविध कार्यक्रमामधील नेत्यांच्या होणाऱ्या गर्दीवरुन दिसून येत आहे. यातूनच निवडणुकांच्या चर्चेला ऊत आले आहे. या क्षेत्रातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. कोण उमेदवार सरस राहील हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्रत्येक गावातील पानटपऱ्यांवर निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. सर्व राजकीय पक्ष आपापली उमेदवार या जि. प. क्षेत्रातील निवडणुकीत पूर्ण शक्तीनिशी उतरविण्याच्या तयारीत दिसून येत आहे.
कार्यकर्तेसुद्धा निवडणूक कार्यासाठी सज्ज झाली आहेत. कवलेवाडा या जिल्हा परिषद क्षेत्रातील होणाऱ्या चौरंगी लढतीत कोणाला फायदा होणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. सध्यातरी या परिसरात गावागावात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. कोणत्याही पक्षाची आघाडी नसल्याने निवडणुकीत चांगलीच चुरस हाेणार असल्याचे दिसून येत आहे. या परिसरात कवलेवाडा व मुंडीकोटा हे दोन्ही गावे मोठी आहेत. त्यामुळे सर्वाच्या नजरा कवलेवाडा जि. प. क्षेत्राकडे लागल्या आहेत.