स्पर्धेतूनच राष्ट्रीय खेळाडू घडतील

By admin | Published: February 13, 2016 01:15 AM2016-02-13T01:15:15+5:302016-02-13T01:15:15+5:30

जीवनातील प्रत्त्येक टप्प्यात मानसाला स्पर्धेला सामोरे जावे लागते. या स्पर्धेत कधी विजय होतो, तर कधी पराजय. या दोन्ही परिस्थितीतून माणूस हा घडत जातो.

There will be a national player from the tournament | स्पर्धेतूनच राष्ट्रीय खेळाडू घडतील

स्पर्धेतूनच राष्ट्रीय खेळाडू घडतील

Next

राजकुमार बडोले : खुल्या कबड्डी स्पर्धेत संत गाडगेबाबा मंडळ विजेता
गोंदिया: जीवनातील प्रत्त्येक टप्प्यात मानसाला स्पर्धेला सामोरे जावे लागते. या स्पर्धेत कधी विजय होतो, तर कधी पराजय. या दोन्ही परिस्थितीतून माणूस हा घडत जातो. क्रीडा स्पर्धेला ही बाब लागू आहे. अशा स्पर्धेतूनच ग्रामीण भागातील खेळाडूंना नैपुण्य दाखविण्याची संधी मिळते व ते पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यापर्यंत मजल मारतात. जिल्ह्यात खेळाडूंसाठी सोयीसुविधा व निधी उपलब्ध करण्यात येत असून यापासून भरीव कार्य होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
ते येथील यंग मल्टीपरपज सेंटरच्यावतीने रामनगर मनोहर म्युनिसीपल शाळेच्या पटांगणावर आयोजित ओपन कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रामुख्याने नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, भाजपचे माजी शहर अध्यक्ष भरत क्षत्रीय, विजयकुमार जायस्वाल, दीपक नशिने, नरेंद्र हालानी, विश्वनाथ सुखदेवे, गजानन नागदवने, भाऊराव उके, प्रदीप ठाकुर, जयंत शुक्ला, शरद क्षत्रीय, केवलराम बादलवार, किरण नखाते, हाजी नईम सुफो, ताराचंद लांजेवार, एन.डी. डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलतांना ना. बडोले यांनी संस्थेचे कौतूक करुन कबड्डी व व्हॉलीबॉल सारख्या खेळांचे आयोजन करुन अनेक खेळाडू घडविले असल्याचे सांगून त्यांचे अभिनंदन केले. तसेच मे महिन्यात आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान या स्पर्धेला उपस्थित जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू नितीन देशमुख, सचिन कटरे, उमेश कनोजे, अविनाश कटरे, राकेश यादव, योगेश बोरकर, संतोष समरीत, सुनील नेवारे, शुभम गाते, ज्ञानेश्वर राऊत, सुनील नेवारे, सोफिया मेश्राम, सीमा दिघोरे, शीतल अंबादे यांचा ना. बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्पर्धेचा विजेता संघ गोंदियाचा संत गाडगेबाबा मंडळ ठरला. तर मॉ आदिशक्ती मंडळ खर्रा, वीर बजरंग क्रीडा मंडळ डोंगरगाव व वायएमसी गोंदिया हे अनुक्रमे द्वितीय, तृतीय व चतुर्थ बक्षिसाचे मानकरी ठरले. तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून राकेश यादव, जितेंद्र पालांदूरकर, राजकुमार लामकासे, सौम्य चाचेरे, योगेश बोरकर यांची निवड करण्यात आली. तत्पुर्वी स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या हस्ते झाले.
प्रास्ताविकेतून सचिव सय्यद वहाब यांनी येत्या आॅक्टोबर महिन्यात राज्यस्तरीय ज्युनिअर कबड्डी स्पर्धेचे आयोजन यंग मल्टीपरपज सेंटरच्यावतीने करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.
आयोजनासाठी पंकज बोरकर, दामोदर शेंडे, नितीन पटले, दिनेश मस्करे, जितेंद्र धोटे, उमेश बैस, योगेश बोरकर आदिंनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: There will be a national player from the tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.