विविध प्रकारची होणार तपासणी

By admin | Published: July 4, 2015 02:06 AM2015-07-04T02:06:35+5:302015-07-04T02:06:35+5:30

सर्व सहकारी संस्थाचे सर्वेक्षण १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहे.

There will be various types of inspections | विविध प्रकारची होणार तपासणी

विविध प्रकारची होणार तपासणी

Next

गोंदिया : सर्व सहकारी संस्थाचे सर्वेक्षण १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. त्यात विविध प्रकारची तपासणी केली जाणार आहे.
जिल्हा उपनिबंधक व जिल्हा विशेष लेखापरिक्षक यांनी ३० सहकार व लेखापरिक्षण विभागातील ३० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथकाची या मोहिमेसाठी नेमणूक करण्यात आली आहे. विशेष पथकातील अधिकारी व कर्मचारी संस्थांना प्रत्यक्ष भेट देतील. या सर्वेक्षणात संबंधित संस्था नोंदणीकृत पत्यावर आहे की नाही, संस्था कार्यस्थगित झाल्याबाबत संस्थेचे सहकार विभागाच्या वेबसाईटवर आॅनलाईन नोंदणी झाली असल्याबाबत संस्थेद्वारे ६ प्रकारचे आॅनलाईन ‘मेंडेटरी रिटर्न’ करण्यात आले की नाही संस्थेच्या आमसभांबाबत माहिती संस्थेद्वारे करण्यात आलेले शेवटचे लेखापरीक्षण आणि संबंधित संस्थेचे निवडणूक प्रक्रिया वेळेमध्ये पार पाडण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास सहकार्य केले असल्याबाबतची माहिती घेवून अहवाल सादर करतील.
हा अहवाल पथकातील कर्मचारी/अधिकारी संस्थेच्या निबंधकास सादर करतील व या अहवालाच्या आधारे निबंधक प्रत्यक्ष खात्री करतील. त्यानुसार संबंधित संस्था सहकार कायद्यानुसार कारवाईस पात्र ठरविल्या जातील.

Web Title: There will be various types of inspections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.