ओळख पटविण्यासाठी हे १२ पुरावे धरले जाणार आहेत ग्राह्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 03:39 PM2024-10-30T15:39:32+5:302024-10-30T15:41:57+5:30

मतदानाच्या वेळी सादर करता येणार : निवडणूक आयोगाची आहे परवानगी

These 12 pieces of evidence are to be considered for identification | ओळख पटविण्यासाठी हे १२ पुरावे धरले जाणार आहेत ग्राह्य

These 12 pieces of evidence are to be considered for identification

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या मतदानावेळी मतदान केंद्रावर आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदारांना देण्यात आलेल्या मतदार ओळखपत्राशिवाय इतर १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.


महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता जिल्ह्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ज्या मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहे ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करु शकतात. मात्र जे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी १२ पुरावे मतदान केंद्रावर सादर करता येणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. 


हे पुरावे ग्राह्य धरले जाणार 
मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक, पोस्ट ऑफिस यांनी जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र-राज्य सरकार-सार्वजनिक उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, आमदारांना देण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र हे पुरावे सादर करता येऊ शकतील.

Web Title: These 12 pieces of evidence are to be considered for identification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.