जीव मुठीत घेऊन ते मोजत आहेत दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 05:00 AM2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:00:21+5:30
गावातील प्रभाग क्रमांक-२ मधील रहिवासी रवी रामा वाघाडे हे ७८ वर्षाच्या आपल्या आईसह, पत्नी व लेकरांना घेऊन जीर्ण घरात राहत आहे. त्यांच्या घराची अवस्था म्हणजे जणू पत्यांचा बंगला असून धक्का दिला तरी पडून जाईल अशी अवस्था आहे. ४ वर्षांचा कालावधी लोटुनही आश्वासना पलीकडे त्यांना काहीच मिळाले नाही. अल्पभूधारक असलेले रवी गुराख्याचा पारंपारिक व्यवसाय करायचे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : ‘गरिबाची गत नाही आणि कुणी जगू देत नाही’ या म्हणीतील वास्तविकतेची झळ येथील वाघाडे व पात्रे कुटुंबियांना सोसावी लागत आहे. उन्हाळा, हिवाळा व पावसाळ््याचा फटका सहन करीत हे कुटुंबीय आपला जीव मुठीत घेऊन जीर्ण घरात एक-एक दिवस मोजत आहेत. यातील वाघाडे यांना ४ तर पात्रे कुटुंबीयांना८ वर्षे झाली असूनही त्यांना घरकुल मिळालेले नाही.
गावातील प्रभाग क्रमांक-२ मधील रहिवासी रवी रामा वाघाडे हे ७८ वर्षाच्या आपल्या आईसह, पत्नी व लेकरांना घेऊन जीर्ण घरात राहत आहे. त्यांच्या घराची अवस्था म्हणजे जणू पत्यांचा बंगला असून धक्का दिला तरी पडून जाईल अशी अवस्था आहे. ४ वर्षांचा कालावधी लोटुनही आश्वासना पलीकडे त्यांना काहीच मिळाले नाही. अल्पभूधारक असलेले रवी गुराख्याचा पारंपारिक व्यवसाय करायचे. मात्र गावातील गुरे-ढोरं व शेळ््या पाळण्याचे प्रमाण कमी झाल्याने हे कामही सुटले व आता पोट भरण्यासाठी मिळेल ते काम करीत आहेत. कधीही पडणार एवढे जीर्ण झालेले घर असल्याने रात्रीला डोळा लागत नसल्याचे रवी सांगतात. सरपंचांना राहण्याची व्यवस्था कुठेतरी करा अशी विनंती केली मात्र त्यांनीही लक्ष दिले नाही अशी कैफियतही त्यांनी मांडली. जगण्याचा प्रश्न गंभीर झाला तर घर बांधायला पैसे कुठून आणायचे हा खरा सवाल रवीच्या डोळ््यासमोर उभा आहे. ज्यांना राहायला घर आहेत, ते पक्के घर पाडून घरकुल बांधतात. परंतु मला गरज असून घर मिळत नाही. मुलगी बाराव्या वर्गात तर मुलगा दहावीत मात्र गेल्या ४ वर्षांपासून घरात हक्काची वीज नसल्याचेही सांगतात.
हीच अवस्था प्रभाग क्र मांक-५ मधील शकून व भारती रामदास पात्रे यांची आहे. या भूमीहीन भारती व तिचे कुटुंबीय गेल्या ८ वर्षांपासून घरकुलाची प्रतीक्षा करीत आहेत. ८ वर्षांत अनेक उन्हाळे-पावसाळे रात्रंदिवस सोबतीला घेऊन जुन्या पडक्या ते घरात गुजराण करीत आहे. ग्रामपंचायतचे उंबरठे झिजवून झाले. पंचायत समितीच्या कितीतरी फेऱ्या झाल्या. परंतु घरकुलाचे योग त्यांच्या नशिबी आले नाही. ग्रामपंचायतचे कर्मचारी वर्षभरापूर्वी येऊन गेले. परिस्थिती पाहून फोटो काढून नेला. परंतु भारती व शकुन गेल्या ८ वर्षांपासून वेटिंगवरच आहेत. भारती पात्रे या म्हातारी सासू, दोन मुली तर त्यांची जाऊ शकून महादेव पात्रे याही विधवा आहेत. मुसळधार पाऊस आला की पावसाच्या धारा भांड्यात झेलत रात्र काढतात. घरची कर्ती माणसं मरण पावल्यामुळे पारंपारिक कुंभार व्यवसाय मोडकळीस आला. त्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करीत उदरनिर्वाह करायचा. मुलाबाळांच्या शिक्षणासोबतच म्हाताºया डोळ््याला न दिसणाºया सासूचा औषधोपचारही करायचा अशी बेताची परिस्थिती त्यांची आहे. यासाठी दोघी मोलकरणीचे काम करून उदरिनर्वाह चालवतात. जीवन जगण्याला पैसे पुरत नाही, तर मग घर बांधायला पैसे आणायचे कुठून? हा या कुटूंबासमोर यक्ष प्रश्न.
गावात आणखी असे लोक आहेत की, ज्यांना तातडीने घरकुलाची गरज आहे. परंतु ‘सरकारी काम, घडीभर थांब’ या म्हणीनुसार त्यांची परवड होत आहे. यामुळेच आज त्यांची परिस्थिती ‘नटसम्राट’ नाटकातील ख्यातनाम नाट्यकलावंत आप्पासाहेब बेलवलकर यांच्यावर जशी कुणी घर देता का घर? राहायला घर असे म्हणण्याची पाळी आल्यास नवल वाटू नये.
मागील वर्षी अतिवृष्टीमध्ये ज्यांची घरे पडली व जी पडण्याच्या मार्गावर आहेत अशा रवी वाघाडे सह एकूण २३ लाभार्थ्यांचे घरकुलाचे प्रस्ताव पंचायत समितीला पाठविले आहेत. ते प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले असून अद्याप मंजूर झाले नाहीत. पुनर्वसन करण्याचे काम तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे आहे.
-अनिरु द्ध शहारे
सरपंच, ग्रामपंचायत नवेगावबांध.