मृताच्या कुटुंबीयांना ‘ते’ देतात तीन हजार रूपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 10:08 PM2018-07-02T22:08:10+5:302018-07-02T22:08:31+5:30
एखाद्यावर दु:खाचे सावट आल्यावर त्यातून सावरायला त्यांना वेळ लागतो. त्यातच आर्थिक परिस्थिती हलाकीची असेल तर त्यातूनच सावरण्यासाठी बराच कालावधी लागतो. कर्जाचेही डोंगर उभे राहाते. समाजातील मृतकांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी छोटा गोंदिया येथील शिवनगर सेवा समितीने मृताच्या कुटुंबीयांना ३००० रूपये देण्याचा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एखाद्यावर दु:खाचे सावट आल्यावर त्यातून सावरायला त्यांना वेळ लागतो. त्यातच आर्थिक परिस्थिती हलाकीची असेल तर त्यातूनच सावरण्यासाठी बराच कालावधी लागतो. कर्जाचेही डोंगर उभे राहाते. समाजातील मृतकांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी छोटा गोंदिया येथील शिवनगर सेवा समितीने मृताच्या कुटुंबीयांना ३००० रूपये देण्याचा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे.
मागील तीन वर्षापूर्वी स्थापन केलेल्या शिवनगर सेवा समितीने तुळशीच्या सामूहिक विवाहाची परंपरा सुरू केली. गावातील छोट्या-छोट्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी नगर परिषदेची वाट न पाहता स्वत:च ती समस्या मार्गी लावण्यासाठी समिती सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. छोटा गोंदिया परिसराच्या शिवनगरातील १०० तरूणांनी एकत्र येऊन शिवनगर सेवा व विकास समिती स्थापन केली. परिसरात एकता, जातीय सलोखा निर्माण करणे व परिसरातील समस्या दूर करणे हा समितीचा उद्देश आहे. समितीमार्फत मागील तीन वर्षांपासून ११० घराचे सामूहिक तुळसी विवाह पार पाडले जात आहे.
या समितीतील तरूण दर महिन्याच्या १ तारखेला एकत्र येऊन प्रती सदस्य २० रु पये देणगी जमा करतात. या माध्यमातून आतापर्यत या तरूणांनी ४० हजार रूपये गोळा केले आहेत. परिसरातील एखाद्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या मृताच्या कुटुुंबियांना ३००१ रूपये सात्वनपर मदत केली जाते. समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहून ज्यांना जे काम जमेल ते काम करून त्या कुटुंबाची मदत करतात. या समाजभिमुख उपक्रमासाठी समितीचे अध्यक्ष दीपक गायधने, सचिव मुकेशकुमार रहांगडाले, कोषाध्यक्ष रवी भांडारकर, माणिक हरिणखेडे, संतोष पाथोडे,छगन रहांगडाले, राजेंद्र हरिनखेडे, नैनक हेमने, अनिल पारधी, रितेश पारधी, नानू बिसेन, संदीप रहांगडाले, रंजित भांडारकर, किशोर चव्हाण, अनिल सोनवणे, राजू चव्हाण, राहुल नागरीकर यांनी पुढाकार घेतला आहे.
वाचनातून आणणार समृद्धी
शिवनगर सेवा समिती छोटा गोंदियाने गोळा केलेल्या ४० हजार रुपयातून परिसरातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्या जाते. समितीतर्फेवाचनालय उघडणे प्रस्तावित आहे. वाचनातून परिसरातून मुलामुलींना समृध्द करण्याचा समितीचा मानस आहे. आजच्या आधुनिक काळातही समाजसेवेची ही परंपरा शिवनगर सेवा समितीने जोपासली आहे.
अनेक समस्या सोडविण्यासाठी हातभार
छोटा गोंदियातील बायपास रस्त्यावर गतिरोधक निर्माण करणे, दिवाबत्ती, पाणी निकास करण्यासाठी नालीची समस्या होती. याचा यशस्वी पाठपुरावा करून नागरिकांच्या बऱ्याच समस्या सोडविल्याचे समितीचे सचिव मुकेशकुमार रहांगडाले यांनी सांगितले.