तिरोड्यात बँकेचा चेक चोरून चोरट्यांनी ३ लाख ६० हजार लंपास केले

By अंकुश गुंडावार | Published: May 13, 2023 12:01 PM2023-05-13T12:01:49+5:302023-05-13T12:01:54+5:30

तक्रारीनुसार, संस्थेचे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेत नजर गहाण खाते आहे.

Thieves looted 360,000 after stealing a bank check in Tiroda | तिरोड्यात बँकेचा चेक चोरून चोरट्यांनी ३ लाख ६० हजार लंपास केले

तिरोड्यात बँकेचा चेक चोरून चोरट्यांनी ३ लाख ६० हजार लंपास केले

googlenewsNext

तिरोडा - तालुक्यातील नवेझरी येथील पांडव सहकारी विपणन भात गिरणीची चोरी गेलेल्या चेकद्वारे तीन लक्ष साठ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष तुषार हरडे यांनी तिरोडा पोलिसात याबाबत तक्रार दिली आहे. 

तक्रारीनुसार, संस्थेचे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेत नजर गहाण खाते आहे. या खात्याचा चेक अज्ञात आरोपींनी चोरून या चेकद्वारे 12 एप्रिल 23 रोजी  जिल्हा सहकारी बँक गोंदियाचे मुख्य शाखेतून संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकांच्या खोट्या सह्या करून तीन लक्ष साठ हजार रुपयाची फसवणूक केली त्याची तक्रार 12 मे रोजी संस्थेचे अध्यक्ष तुषार मोरेश्वर हरडे यांनी तिरोडा पोलिसात दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 403.420.465.468, 471. 472 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर हनवते करीत आहेत.

Web Title: Thieves looted 360,000 after stealing a bank check in Tiroda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.