शेकडो गाण्यांवर थिरकले तरूण

By admin | Published: July 1, 2014 01:34 AM2014-07-01T01:34:34+5:302014-07-01T01:34:34+5:30

लोकमत युवा नेक्स्ट, बाल विकास मंच व इंडियन मेडीकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी स्थानिक जैन कुशल भवनात आयोजित जस्ट डान्स २०१४ या स्पर्धेत मराठी,

Thirakale young on hundreds of songs | शेकडो गाण्यांवर थिरकले तरूण

शेकडो गाण्यांवर थिरकले तरूण

Next

गुणवंतांचा सत्कार : अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दिले प्रोत्साहन
गोंदिया : लोकमत युवा नेक्स्ट, बाल विकास मंच व इंडियन मेडीकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी स्थानिक जैन कुशल भवनात आयोजित जस्ट डान्स २०१४ या स्पर्धेत मराठी, हिंदी अशा शेकडो गाण्यांवर तरूण-तरूणीचे व बालकांचे पाय थिरकले. आपल्यातील कला, कौशल्याचे प्रदर्शन येथे करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला अतिथी म्हणून नगरसेवक अशोक (गप्पू) गुप्ता, नगरसेवक राहुल यादव, लोकमत कार्यालय प्रमुख प्रशांत मिश्रा उपस्थित होते. लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
या जस्ट डान्स २०१४ स्पर्धेत नाच मयूरी, अप्सरा आली, राधा ही बावरी, लुंगी डान्स, गणेश वंदना, कत्थक, लावणी, लोकनृत्य, समूह नृत्य सादर करण्यात आले. सकाळी ११ वाजतापासून सायंकाळी ६ वाजतापर्यंत कार्यक्रम सुरू राहिले. जस्ट डान्स ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. एकल नृत्यात पहिला गट इयत्ता ३ ते ६ चा होता. या गटात प्रथम क्रमांक प्रोग्रेसिव्ह स्कूल येथील सिध्दी क्षिरसागर, व्दितीय नितेश गवळी, दुसरा गट ७ ते ९ चा होता. यात प्रथम दिया धर्वे, व्दितीय मोहिनी ठरली. तृतीय गट युवकाचा होता. यात हितेश गवळी यांनी प्रथम तर आभाने व्दितीय क्रमांक पटकाविला. समूह नृत्य स्पर्धेत प्रथम गटात स्पार्कप अ‍ॅकेडमी गोंदियाच्या चमूने तर व्दितीय क्रमांक कान्हा ग्रुप आमगावने पटकाविला. दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक जी-९ ग्रुप गोंदिया तर दुसरा क्रमांक युनिक ग्रुप गोंदियाने पटकाविला. यावेळी इयत्ता दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या हस्ते करण्यात आला. दहावीतील गुणवंत विद्यार्थी आकाश कोतवाल, दीपिका वाघमारे, अभिषेक रहांगडाले, पूनम तुरकर, शामिल मिश्रा, भारती बजाज, मनीष खंडेलवाल, आयुष खंडेलवाल, योगेश बजाज, प्रफुल रहांगडाले, बारावीतील प्रशांत पारधी, मोनाली कावळे, नंदकिशोर उरकुडे, हितेश कोरे, स्वप्निल राठी, संजीव लाल, वैभव गहाणे, नेहाल शेंडे, आस्था पांडे आणि ग्रीष लालवानी यांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास केला, पाहिजे ते यश सहजरीत्या मिळविता येते. कठीण परिश्रमातूनच यशाची दारे उघडी होतात. यासाठी कठीण परिश्रम घेण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवायला हवी. कार्यक्रमादरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. घनश्याम तुरकर यांनी भेट दिली. ते विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले, आम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. गुणवंत विद्यार्थ्यांनी भविष्यात यशस्वीरीत्या वाटचाल करावी यासाठी शुभेच्छा देत त्यांनी बेटी बचाव व रक्तदानावर मार्गदर्शन करण्यात आले. जस्ट डान्स स्पर्धेचे परीक्षण भंडाराचे लिकेश खेताडे, भरत चौरसिया यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन मराठी अभिनेता महेश सोनी व लोकमत युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत यांनी केले. समारोपीय कार्यक्रमाला प्रताप मेमोरियल ट्रस्टचे सचिव प्रफुल अग्रवाल, लायन्स क्लब ग्रीनसिटीचे अध्यक्ष अपूर्व अग्रवाल, गगन अग्रवाल, लोकमत बालविकास मंचचे संयोजक श्रीकांत पिल्लेवार, मनीष रहांगडाले, प्रमोद गुडधे, उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना प्रफुल्ल अग्रवाल म्हणाले, सामाजिक बांधिलकी ठेवून लोकमत अनेक वर्षापासून कार्य करीत आहे. लोकमतचे कार्य वाखाणण्याजोगे असून बाल, तरूण व ज्येष्ठांसाठी अनेक कार्यक्रमांची मेजवानी लोकमतकडून दिली जाते, असे ते म्हणाले. यशस्वीतेसाठी रोशन बोहरे, दर्पण माने, लकी भोयर, मीना दीक्षित, धर्मराज काळे, संतोष बिलोणे व लोकमत युवा नेस्टच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Thirakale young on hundreds of songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.