वनरक्षकाच्या खुनातील तिसऱ्या आरोपीस अटक
By admin | Published: May 29, 2017 01:51 AM2017-05-29T01:51:53+5:302017-05-29T01:51:53+5:30
सालेकसा तालुक्यातील पिपरिया बिटातील वनरक्षक रविंद्रसिंग जतपेले (५०) रा. सालेकसा यांचा वनतस्करांनी २३ मे च्या रात्री उभारीने मारून खून केला.
१ जूनपर्यंत पोलीस कोठडी: लाकडे चोरून नेतांना पकडल्याचा राग
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सालेकसा तालुक्यातील पिपरिया बिटातील वनरक्षक रविंद्रसिंग जतपेले (५०) रा. सालेकसा यांचा वनतस्करांनी २३ मे च्या रात्री उभारीने मारून खून केला. या संदर्भात तिसऱ्या आरोपीला सालेकसा पोलिसांनी अटक केली आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
वनरक्षक रविंद्रसिंह जतपेले (५०) आपली ड्युटी करून २३ मे रोजी रात्री ८.३० वाजता दरम्यान सालेकसा येथे मोटार सायकलने घरी परत जात होता. त्यांची मोटारसायकल हळूवार जात असताना आरोपींनी मोटार सायकल धावत असताना त्यानच्या डोक्यावर उभारीने मारून खाली पाडून ठार केले. नंतर मृतदेह मोटार सायकलने नाल्याजवळ नेवून टाकले.
या प्रकरणात सहा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. त्यात रेवाराम शेषराम नागपुरे (२२) रा. गोवारीटोला (सालेकसा) व रविंद्र धनराज उईके (२७) रा. पिपरीया या दोघांना अटक करण्यात आली.
त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता या प्रकरणात पिपरीया येथील हंसराज चैनलाल उईके (२१) याचा समावेश असल्याचे लक्षात आल्याने शुक्रवार (दि.२६) मे रोजी हंसराजला अटक करण्यात आली आहे.
वनरक्षकाच्या खुनातील तिसऱ्या आरोपीस अटक करण्यात आली. वनतस्करी करणाऱ्या लोकांनी आपला हेतू साध्य होत नसल्याचे पाहून वनरक्षक जतपेले यांचा खून केला. सदर आरोपींविरूध्द सालेकसा पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.