तिसरे अपत्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांना करणार बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 10:24 PM2019-08-16T22:24:10+5:302019-08-16T22:24:57+5:30

लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी शासकीय सेवेत असणाºया अ,ब,क,ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना २८ मार्च २००५ नंतर तिसरा अपत्य झाल्यास त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा नियम आहे. सन २००५ नंतर तिसरे अपत्य असलेले शेकडो कर्मचारी जिल्हा परिषद अंतर्गत सेवा देत आहेत.

The third child will be staffed by children | तिसरे अपत्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांना करणार बडतर्फ

तिसरे अपत्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांना करणार बडतर्फ

googlenewsNext
ठळक मुद्देजि.प.ने उचलले पाऊल : जिल्ह्यात २००५ नंतर शेकडो कर्मचाºयांना तीन अपत्य?

नरेश रहिलो।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी शासकीय सेवेत असणाºया अ,ब,क,ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना २८ मार्च २००५ नंतर तिसरा अपत्य झाल्यास त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा नियम आहे. सन २००५ नंतर तिसरे अपत्य असलेले शेकडो कर्मचारी जिल्हा परिषद अंतर्गत सेवा देत आहेत. त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी जिल्हा परिषदेने आता कडक पाऊल उचलले आहे. या नियमाची पहिली विकेट गेली आहे.
लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र शासकीय नोकरीवर लागतांना द्यावे लागते. नोकरीत लागतांना शपथपत्रात दोनच अपत्य असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन पेक्षा जास्त अपत्य असल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी ३ जुलै रोजी पत्र काढून सर्व खातेप्रमुखांना हे पत्र पाठविले. आपल्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना त्वरीत किती अपत्य आहेत याचे प्रमाणपत्र, शपथपत्र सादर करा असे सूचविले आहे. परंतु महिनाभराचा कालावधी लोटूनही अद्याप तालुकास्तरावरून माहिती जि.प.ला प्राप्त झाली नाही.
दोन पेक्षा अधिक अपत्य असलेले शेकडो लोक नियमाच्या बाहेर असूनही खुशाल नोकरी करीत आहेत. त्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याचा चंग डॉ.राजा दयानिधी यांनी बांधला आहे. ही माहिती २३ जुलैपर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्याचे निर्देश दिले आहे. परंतु खंडविकास अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती पाठविली नाही. लहान कुटुंब म्हणजे पती पत्नी व दोन मुले-मुली असा आहे.
सुरूवातीला एक मूल असे आणि दुसऱ्या वेळी जुळे मुले जन्मली तर त्यांना यात सूट आहे.गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांनी आपापल्या अपत्यांची खरी माहिती दिल्यास २००५ नंतर तिसरा अपत्य होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता तिसरे अपत्य असणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांना घरचा रस्ता दाखविण्याची मोहीम सुरू केली आहे.
चुकीची माहिती देणाºयांवर फौजदारी गुन्हा
नोकरी जाऊ नये यासाठी तिन अपत्य असणारे लोक दोनच अपत्य असल्याचे खोटे शपथपत्र देण्याची शक्यता नाकारता येत नाही.ज्यांनी खोटे शपथपत्र सादर केले तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई जि.प.करणार आहे. त्यासाठी सत्य माहिती जि.प.ला देणे अपेक्षित आहे.
पोलीस विभागातही शोध मोहीम
पोलीस विभागाबरोबर इतर विभागातही सन २००५ नंतर तिसरा अपत्य असणारे लोक नोकरी करीत आहेत.त्यांचेही शपथपत्र मागविल्यास पोलीस विभागासह अनेक विभागांचाही आकडा यासंदर्भात फुगून दिसेल.यासाठी संबधीत विभागाच्या बड्या अधिकाºयांनी लक्ष घालावे.
यांना केले बडतर्फ
महाराष्ट्र नागरी सेवा २००५ च्या नियमाचे पालन न करणाºया चांदोरी खुर्द परसवाडा येथील सहाय्यक शिक्षक लक्ष्मी लिलाराम गोंधुळे यांना बडतर्फ करणयाची कारवाई जिल्हा परिषदेने केली.त्यांना ४ अपत्य असतांना ते शासकीय सेवेचा फायदा घेत आहेत. या त्यांच्या बडतर्फ करण्याच्या मुकाअ यांच्या आदेशाला अप्पर आयुक्त नागपूर यांनी स्थगीत केले असून त्यावर १७ सप्टेंबर २०१९ रोजी सुनावणी ठेवली आहे.

Web Title: The third child will be staffed by children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.