तिसऱ्या दिवशीही डाकसेवकांचा बेमुदत संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 10:30 PM2018-12-20T22:30:41+5:302018-12-20T22:31:53+5:30
आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटना व नॅशनल युनियन आॅफ ग्रामीण डाक सेवक संघटना यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने बेमुदत देशव्यापी संप सुरु आहे. १८ डिसेंबर सुरु असलेल्या संपामुळे अनेक शासकीय कामे रखडल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटना व नॅशनल युनियन आॅफ ग्रामीण डाक सेवक संघटना यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने बेमुदत देशव्यापी संप सुरु आहे. १८ डिसेंबर सुरु असलेल्या संपामुळे अनेक शासकीय कामे रखडल्याचे चित्र आहे.
संयुक्त कृती समितीच्या वतीने आयोजित संपात गोरेगाव उपडाकघर अंतर्गत सर्व ग्रामीण डाकघरचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. जीडीएस बांधकाम सेवानिवृत्तीचे फायदे १ जानेवारी २०१६ पासून देण्यात यावे. ग्रामीण डाक सेवकांच्या ग्रॅज्युईटीची सीमा १ लाख ५० हजार रुपयांवरुन ५ लाख रुपये करण्यात यावी, डाकसेवकांना नोकरीत बढती देण्यात यावी, घरभाडे देण्यात यावे, ग्रामीण डाक सेवकांना खात्यात स्थायी करण्यात यावे. आदी मागण्यांच्या संदर्भात गोरेगाव पोष्ट आॅफीस अंतर्गत येणाºया सर्व शाखा, डाकघरच्या कर्मचाºयांनी या प्रमुख मागण्यांना घेवून संपक पुकारला आहे. संपात आर.एम. पंचभाई, वि.के. मुंगमोडे, जी.एच. कांबळे, एस.एम. पंचभाई, एम.बी. राऊत, ए.आर. रंगारी, के.जी. मोगरे, एस.एस. टेंभुर्णे, एस.बी.लांजेवार, एल.पी.मडावी, ओ.एम.ठाकूर, जे.जे.शेंडे, डी.सी.भगत, पि.टी.शिंगाडे, बी.के. हरिणखेडे, एस.ए. उंदिरवाडे, एम.एम. भेंडारकर, सी.आर. येळे, एम.एल. रहांगडाले, जी.जी.येळे, बी.एस. मेश्राम, एस.एस.सोनवाने, वाय.एन.चव्हाण, के.आर.डोंगरे, डी.एस. बागळे, जी. जी. ठाकरे, सी.पी. जनबंधू, यु.एस.धमगाये, भारती ठाकरे, के.सी.डोहळे यांचा समावेश आहे.