कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी तिसऱ्यांदा निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 10:06 PM2018-04-08T22:06:00+5:302018-04-08T22:06:00+5:30

शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात यावे यासाठी नगर परिषदेने विशेष सर्वसाधारण सभेत ठराव पारीत केला. शहरवासीयांसाठी हा आनंदाचा विषय असला तरिही खेदाची बाब अशी की, कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम करण्यास कुणीही इच्छूक नसल्याचे ......

Third time tender for dog breeding | कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी तिसऱ्यांदा निविदा

कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी तिसऱ्यांदा निविदा

Next
ठळक मुद्देप्रकरण चालले रेंगाळत : काम करण्यास कुणीही इच्छूक नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात यावे यासाठी नगर परिषदेने विशेष सर्वसाधारण सभेत ठराव पारीत केला. शहरवासीयांसाठी हा आनंदाचा विषय असला तरिही खेदाची बाब अशी की, कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम करण्यास कुणीही इच्छूक नसल्याचे काढण्यात आलेल्या निविदेतून दिसून येत आहे. परिणामी यापुर्वी दोन वेळा काढण्यात आलेल्या निविदांत कुणीही भाग घेतला नाही. त्यामुळे नगर परिषदेला आता नवीन आर्थिक वर्षात पहिल्यांदा, मात्र वास्तवीक तिसऱ्यांदा निविदा काढावी लागली आहे.
शहरात बेवारस कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे रात्रीला घरातून निघणे धोकादायक झाले आहे. हे बेवारस कुत्रे कधी कुणाचा चावा घेतील याचा काही नेम नसून अशा घटना शहरात घडल्या आहेत. त्यामुळे बेवारस कुत्र्यांना बघूनच शहरवासी घाबरत आहेत. शहरवासियांची ही समस्या लक्षात घेत नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी २७ आॅक्टोबर २०१७ रोजी घेतलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शहरातील बेवारस कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा प्रस्ताव मांडला होता.
शहरातील वातारवरणाच्या दृष्टीने हा प्रस्ताव योग्य असल्याने सर्वानुमते या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान कुत्र्यांच्या निर्बिजकरणाच्या या कामासाठी नगर परिषद स्वच्छता विभागाने जानेवारी महिन्यात निविदा काढली होती. फेब्रुवारी महिन्यात निविदा उघडण्यात आली असता आश्चर्याची व तेवढीच खेदाची बाब अशी की, या निविदेत कुणीही अर्ज टाकला नाही. यामुळे कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम होऊ शकले नाही.
नगर परिषदेने या विषयावर ठराव घेतला असल्याने तसेच शहरवासीयांच्या हिताचा हा विषय असल्यामुळे स्वच्छता विभागाला हे काम करणे गरजेचे झाले आहे. परिणामी, स्वच्छता विभागाने मार्च महिन्यात दुसरी निविदा काढली. मात्र त्याचाही काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे आता नगर परिषदेने नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल महिन्यात शनिवारी (दि.६) पहिली, मात्र वास्तवीक तिसऱ्यांदा निविदा काढली आहे.
तोडगा काढणे गरजेचे
बेवारस कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढणे अत्यंत गरजेचे झाले असल्याचे दिसत आहे. मध्यंतरी सिव्हील लाईन्स परिसरात एका चवताळलेल्या कुत्र्याने कित्येकांना चावा घेतला होता. या प्रकारामुळे सिव्हील लाईन्सवासी दहशतीत वावरत होते. असे प्रकार अन्यत्र कोठे ही घडू नये यासाठी कुत्र्यांच्या या समस्येवर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी शहरवासी करीत आहेत.

Web Title: Third time tender for dog breeding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dogकुत्रा