साडेतेरा हजार मतदार वगळले

By admin | Published: April 19, 2015 12:47 AM2015-04-19T00:47:19+5:302015-04-19T00:47:19+5:30

तिरोडा विधानसभा क्षेत्रात गेल्या दोन दशकानंतर साडेतेरा हजार मतदार यादीतून कमी करण्यात आले आहेत.

Thirty-seven thousand voters left | साडेतेरा हजार मतदार वगळले

साडेतेरा हजार मतदार वगळले

Next

तिरोडा विधानसभा क्षेत्र : अनेकांचे स्थलांतर, काहींचा मृत्यू तर काही नावे डबल
तिरोडा : तिरोडा विधानसभा क्षेत्रात गेल्या दोन दशकानंतर साडेतेरा हजार मतदार यादीतून कमी करण्यात आले आहेत. या मतदारांमध्ये काही मृत मतदार तर अनेक जण स्थलांतरित झालेले होते. विशेष म्हणजे काही मतदारांची नावे पुन्हा पुन्हा दोन ठिकाणी होती त्यांचे दुसरे नाव यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकात मतदानाची टक्केवारी निश्चितपणे वाढणार आहे.
भारतीय निवडणूक आयोगाकडून वर्षातून दोन वेळा पुनर्निरीक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. नव्याने मतदाराला समाविष्ट केले जात होते. मात्र २० वर्षापासून मृत, स्थलांतरित आणि दुबार मतदार वगळण्याचे कामे केले जात नव्हते. यामुळे मतदानाच्या वेळी मतदान अधिकाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्याचबरोबर मतदानाची टक्केवारीसुद्धा कमी दिसून येत होती.
तिरोडा विधानसभा क्षेत्रात तीन तालुक्यातील गावांचा समावेश असून एकूण बुथ संख्या २८८ आहे. गोरेगाव तालुक्याचे एकूण ७८ बुथ आहेत. गोंदिया ४५ आणि तिरोडा तालुक्यात १६५ बुथचा समावेश आहे. गोरेगाव क्षेत्रातील गावांमध्ये पुरुष २९४०१ व स्त्रिया मतदार २९८६४ अशी एकूण ५९ हजार २६५ मतदार संख्या आहे. गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील मतदार पुरुष ९० हजार १७९ व स्त्रिया ८९ हजार ८५३ आहे. संपूर्ण क्षेत्रात पुरुष १ लाख २१ हजार ३५४ आणि स्त्रिया मतदार १ लाख २१ हजार ८३९ असे एकूण २ लाख ४३ हजार १९३ मतदार आहेत.
दोन वर्षापूर्वी (२०१३) विधानसभा क्षेत्राची मतदार संख्या २ लाख २३ हजार ९७८ इतकी होती. २०१४ च्या मतदान यादीतील बोगस नावे १३ हजार ५२६ नावे वगळल्याने आणि आतापर्यंत नवीन नावे समाविष्ट केल्यानंतर मतदारांचा आकडा २ लाख २७ हजार ७६७ एवढा झाला आहे. येणाऱ्या निवडणुकीत मतदार प्रक्रियेदरम्यान मतदानाची टक्केवारी अधिक दिसून येईल. त्याचबरोबर मतदान अधिकाऱ्यांना तसेच उमेदवारांना सुद्धा निवडणुकीचे गणित काढण्याकरिता अंदाज लागू शकेल. (प्रतिनिधी)

‘लोकमत’ने आणले होते निदर्शनास
गेल्या २२ आॅक्टोबरला ‘लोकमत’ने तिरोडा विधानसभा क्षेत्राच्या मतदार यादीत २० हजार मतदार बोगस असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल सर्वत्र घेऊन मतदार यादीत समाविष्ट असणारे मृत, स्थलांतरित आणि दुबार मतदार काढण्याची मोहीम निवडणूक आयोगाने हाती घेतली. तरी देखील स्थलांतरीत मतदारांची संख्या हजारो असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. कौटुंबिक सदस्य याबाबतची वास्तविकता लपवित असल्याने ही समस्या निर्माण होत आहे.

असे वगळले मतदार
वगळण्यात आलेल्या मतदारांत मृत मतदार ७९२८, स्थलांतरित मतदार ४६९८ आणि दुबार नावे असणारे मतदार ९०० असे एकूण १३ हजार ५२६ आहेत. यात पुरुष ७००४ आणि सित्रा ७९२८ आहेत. वास्तविक पाहता १४७४ आणि स्त्री मतदार २१२२ असे एकूण ३८९६ मतदार नव्याने समाविष्ट झाल्याने पूर्वी असलेल्या मतदार संख्येतून ११ हजार ३६ मतदार संख्या कमी झाली आहे.

Web Title: Thirty-seven thousand voters left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.