‘त्या’ नक्षलवाद्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 09:40 PM2018-04-26T21:40:50+5:302018-04-26T21:40:50+5:30
केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नागनडोह जंगलात बुधवारी पोलीस व नक्षल चकमकी संदर्भात १५ नक्षलवाद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नागनडोह जंगलात बुधवारी पोलीस व नक्षल चकमकी संदर्भात १५ नक्षलवाद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये जगदीश टेकाम, राजा मडावी, बलराज, राकेश, सुखदेव, रामदास हलामी, आझाद, स्वरुपा, वंदना, शिल्पा, महेश, विजू व इतर तीन अशा १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया नागणडोह जंगलात बुधवारच्या सकाळी ६.३० वाजता पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक नक्षलवादी जखमी झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांना यमसदनी पाठविल्यामुळे गडचिरोलीत धास्तावलेले नक्षलवादी गोंदिया जिल्ह्यात आले होते. १५ नक्षलवाद्यांनी ससी-६० च्या तीन पार्ट्यांवर गोळीबार केला. तर पोलिसांनीही नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलाच्या दिशेने फरार झाले. गडचिरोली जिल्ह्यात ३७ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यामुळे आपल्या बचावासाठी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी गोंदिया जिल्ह्यात आल्याची माहिती आहे. सदर नक्षलवाद्यांविरूद्ध केशोरी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७, ३५३, १४३, १४७, १४८, १४९, सहकलम भारतीय हत्यार कायदा ३, २५, २७, बेकायदेशिर हालचाली प्रतिबंधात्मक कायदा कलम १६, २०, २३ सहकलम ३७ (१), १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.