स्वत:चा पक्ष न सांभाळता येणाऱ्यांनी राजकारण सोडून द्यावे

By अंकुश गुंडावार | Published: May 8, 2023 04:47 PM2023-05-08T16:47:54+5:302023-05-08T16:48:24+5:30

Gondia News जे नेते आपला पक्ष सांभाळू शकत नाही. आमदारांना सांभाळू शकत नाही ते नेते लायकीचे नसून त्यांनी राजकारण सोडून द्यावे, असा घणाघात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खा. संजय राऊतांवर केला.

Those who cannot manage their own party should leave politics | स्वत:चा पक्ष न सांभाळता येणाऱ्यांनी राजकारण सोडून द्यावे

स्वत:चा पक्ष न सांभाळता येणाऱ्यांनी राजकारण सोडून द्यावे

googlenewsNext

अंकुश गुंडावार

गोंदिया : शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा प्लान होता, असा आरोप ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून केला होता. यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले आहे. पक्ष फोडण्याचा डाव होता तर डाव होऊ देवू नका. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस फुटत आहे. जे नेते आपला पक्ष सांभाळू शकत नाही. आमदारांना सांभाळू शकत नाही ते नेते लायकीचे नसून त्यांनी राजकारण सोडून द्यावे, असा घणाघात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खा. संजय राऊतांवर केला. ना.सुधीर मुनगंटीवार हे सोमवारी (दि.८) गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.


देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल माहीत असेल, असे खा. शरद पवारांनी म्हंटले होते. यावर मुनगंटीवार म्हणाले, जर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आधीच माहित होत असतील तर कशाला पैसे खर्च करायचे? कोणीही व्यक्ती असा दावा करीत असेल तर आश्चर्य आहे. तर, सामना हे वृत्तपत्र नसून शिवसेनेचे पॅम्प्लेट आहे. सामना हे जर वृत्तपत्र असते तर त्याच्यामध्ये सामान्यांचे प्रश्न आले असते, अशी टीकाही त्यांनी ठाकरे गटावर केली आहे. दरम्यान, बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे खा. शरद पवार यांची मुंबईमध्ये येऊन भेट घेणार आहेत. यावर मुनगंटीवार यांना विचारले असता त्यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका करत त्यांना स्वतःचे राज्य सांभाळत नाही. त्यांच्या राज्याचा प्रगतीचा वेग अजूनही कमी आहे. यांना मोदीजी नको आहेत. यांना स्वैराचारी सत्ता पाहिजे, असा निशाणा त्यांनी साधला आहे.

Web Title: Those who cannot manage their own party should leave politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.