ज्यांना मूलबाळ नाही त्यांना कुटुंबियांच्या वेदना काय कळणार; नाना पटोलेंचा मोंदीना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 08:26 PM2022-03-01T20:26:36+5:302022-03-01T20:27:02+5:30
Gondia News ज्यांना मुलं बाळ नाही त्यांना कुटुंबियांच्या वेदना कळणार नाहीत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी येथे केले.
गोंदिया : आपल्या देशातून कुठली मदत आपल्या देशातील युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थांना मिळालेली नाही. आपल्या देशातील केंद्रीय दूतावाससुद्धा त्या विद्यार्थांचा फोन उचलत नाही. केंद्र सरकार म्हणते तुम्ही काही गडबड करू नका आम्ही सगळं बघून घेऊ. मात्र आज ज्यांचे मुलं त्याठिकाणी शिकत आहेत. त्यांच्या कुटूंबियांना काय वेदना होत असतील. ज्यांना मुलं बाळ नाही त्यांना कुटुंबियांच्या वेदना कळणार नाहीत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी येथे केले.
तालुक्यातील प्रतापगड येथे महाशिवरात्री निमित्त पूजा अर्चा करण्यासाठी ना. पटोले हे मंगळवारी आले होते. यावेळी मीडियाला प्रतिक्रिया देताना बोलत होते. पटोले म्हणाले केंद्रातील सरकार आपल्या देशातील लोकं युक्रेनमधून आणण्यात कमी पडला आहे. हे सत्य आहे आणि त्यांनी हे मान्य केलं पाहिजे. ज्यांना मुले बाळे नाही अश्या लोकांना त्यांच्या वेदना कळणार नाही. युक्रेनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी अडकून आहेत मी स्वतः त्या विद्यार्थ्यांशी फोन वर बोललो त्यांचे व्हिडियो पाहिले भारताच्या विदेश मंत्रालयाशी मी अनेकदा बोलले असून त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोपही पटोले यांनी केला.
आता पाच राज्याच्या निवडणुका सुरु झाल्या आणि या निवडणुकामध्येच युक्रेनमध्ये युद्ध सुरु होणार होते. असे रशियाच्या माध्यमातून सगळीकडे अल्टिमेट दिले जात होते. तेव्हा ही भारताचे प्रधान सेवक निवडणुकीत व्यस्त होते. मात्र युद्धा आधीच युक्रेनमध्ये असलेल्या बाकी देशांच्या विद्यार्थांना त्यांच्या देशांनी त्यांना स्वदेशात घेऊन जाण्याची सोय केली असल्याचे तिथे अडकलेल्या विद्यार्थानी सांगितले आहे. मात्र आपल्या देशातून कुठली मदत आपल्या देशातील युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थांना मिळालेली नसल्याचा आरोप पटोले यांनी केला.
त्यांना सद्बुध्दी येवो
कुठलही ऑपरेशन करा जे बंकर खाली मुलं आहेत त्यांना सुखरुप मायदेशी आणा. त्या ठिकाणातील मुलींचं व्हिडीओ पहिले तर त्या मुलीनं सांगितलं की या ठिकाणावर मुली गायब होत आहेत. मात्र मुलांना मात्र काही करत नाही असे मुलींचे व्हिडीओ येत आहेत. हे सगळं बघून देशाचे पंतप्रधान जागे होणार का असा टोलाही पटोले यांनी लावला.