महापुरुषांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 08:35 PM2018-02-08T20:35:52+5:302018-02-08T20:36:18+5:30

महाराष्ट्र हा थोर महापुरुषांचे राज्य आहे. राज्याला प्रगती पथावर नेण्यासाठी महापुरुषांच्या विचारांचाच वारसा घ्यावा लागतो. संताचे विचार प्रत्येक मानवाला कल्याणाकडे नेणारे आहे.

The thoughts of the great men are inspirational for all | महापुरुषांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी

महापुरुषांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी

Next
ठळक मुद्देरचना गहाणे : नवेगावबांध येथील संत नरहरी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
इसापूर : महाराष्ट्र हा थोर महापुरुषांचे राज्य आहे. राज्याला प्रगती पथावर नेण्यासाठी महापुरुषांच्या विचारांचाच वारसा घ्यावा लागतो. संताचे विचार प्रत्येक मानवाला कल्याणाकडे नेणारे आहे. त्यांच्या विचारांनीच माणूस प्रगती पथावर जात आहे. संत नरहरी महाराजांनी आयुष्यभर समाजाच्या सेवेसाठी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा, जुन्या चालीरीेती संपुष्टात आणण्यासाठी थोर संत महापुरुषांनी महान कार्य केले. त्यामुळे संत महापुरुषांचे विचाराच सर्व समाजासाठी प्रेरणादायीच आहेत. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी केले.
तालुका सोनार समाज संघटनेच्यावतीने नवेगावबांध येथे आयोजित संत नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. यावेळी सोनार समाजाचे गोंदिया जिल्हा महासचिव मधुकर कावळे, नवेगावबांधचे सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, कान्होलीचे सरपंच संजय खरवडे, कृष्णराव गजापुरे, हरी पोवळे, महादेव बोरकर, स्वाती गजापुरे, मुलचंद गुप्ता, खांबायती मडावी व सोनार समाजातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध मान्यवरांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी संत नरहरी महाराजांच्या जिवन चरित्र्यावर प्रकाश टाकला. उपस्थित मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला सोनार समाजातील महिला-पुरुष मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Web Title: The thoughts of the great men are inspirational for all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.