तलावातील हजारो माशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 09:24 PM2019-06-28T21:24:22+5:302019-06-28T21:24:36+5:30

नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्राम रिसामा येथील राधाकृष्ण मंदिर परिसरातील जोडाबोडी तलावात हजारो मासे मरण पावल्याचे शुक्रवारी (दि.२८) सकाळी आढळून आले आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय करणारे दुर्गाप्रसाद रहेकावार, भाऊलाल भविरया व संस्थेचे दिड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.

Thousands of fish in the lake die | तलावातील हजारो माशांचा मृत्यू

तलावातील हजारो माशांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देमत्स्य व्यवसायी अडचणीत : दोन ते अडीच लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्राम रिसामा येथील राधाकृष्ण मंदिर परिसरातील जोडाबोडी तलावात हजारो मासे मरण पावल्याचे शुक्रवारी (दि.२८) सकाळी आढळून आले आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय करणारे दुर्गाप्रसाद रहेकावार, भाऊलाल भविरया व संस्थेचे दिड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे. अचानक हजारो मासे मरण पावल्याने कुणीतरी जाणूनबुजून विषारी रसायन टाकले किंवा उष्णतेमुळे मासे मरण पावले असण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे.
गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तलावांमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेकांनी या तलावात मत्स्य व्यवसाय सुरू केला आहे. आमगाव नगर परिषद अंतर्गत येणाºया रिसामा येथील राधाकृष्ण मंदिर परीसरातील जोडाबोडी तलाव मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून भाडे तत्त्वावर घेण्यात येत आहे. तलावात मत्स्य व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची गुजारण करतात. अनेक अडचणींवर मात करून ते हा मत्स्य व्यवसाय करतात. आजूबाजूला राहणाऱ्यांना मासे मरण पावल्याचे दिसले.
परंतू रात्रभरात संपुर्ण तलावातील हजारो मासे मरण पावल्याचे शुक्रवारी (दि.२८) पहाटे माहीती झाले. सकाळी ५ वाजतापासून मेलेले मासे काढण्याचे काम केले असता सुमारे १० ते १५ क्विंटल मासे मरण पावल्याचे दिसून आले. त्यामुळे संस्थेचे दिड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच तलावातील पाणी सुद्धा दुषीत झाले आहे. तलावातील पाणी साठवन क्षमतेच्या १५ ते २० टक्के पाणी साठा असून सुद्धा मासे अचानक मरण पावल्यामुळे कुणीतरी जाणूनबुजून विषारी रसायन टाकले असावे किंवा उष्णतेमुळे मासे मृत्यू पावले असावे याबाबत चर्चा सुरू आहेत. घटनेची चौकशी करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी संस्थेचे अध्यक्ष भाऊलाल भविरया, सचिव दुर्गाप्रसाद रहेकवार व संचालक मंडळांनी मत्स्य विभागाकडे मागणी केली आहे.

Web Title: Thousands of fish in the lake die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.