हजारो हेक्टरमधील धानाचे पऱ्हे संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 05:00 AM2020-06-22T05:00:00+5:302020-06-22T05:00:52+5:30
यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १ लाख ९९ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक १ लाख ८९ हजार हेक्टर धानाचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा ओळखला जातो. मात्र मागील दोन तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. त्यातच वातावरणातील बदलाचा परिणाम शेतीवर झपाट्याने होत असल्याने उत्पादनात सुध्दा घट होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मृग नक्षत्राला सुरूवात होवून १६ दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्यापही जिल्ह्यात दमदार मृगाच्या सरी बरसल्या नाही. त्यामुळे बळीराजाचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. तर काही शेतकऱ्यांनी मृगाचा थोडा फार पाऊस झाल्यानंतर धानाचे पऱ्हे टाकले. मात्र पावसाने पाठ फिरविली असल्याने जिल्ह्यातील हजारो हेक्टरमधील धानाचे पऱ्हे संकटात आले आहे. येत्या तीन चार दिवसात पाऊस न झाल्यास काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १ लाख ९९ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक १ लाख ८९ हजार हेक्टर धानाचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा ओळखला जातो. मात्र मागील दोन तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. त्यातच वातावरणातील बदलाचा परिणाम शेतीवर झपाट्याने होत असल्याने उत्पादनात सुध्दा घट होत आहे. त्यामुळे शेती म्हणजे तोट्याचा सौदा होत चालल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी मृगाचा पाऊस होताच पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. ७ जूनपासून मृग नक्षत्राला सुरूवात झाली. सुरूवातील जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुध्दा धानाचे पऱ्हे टाकण्यास सुरूवात केली. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकºयांनी आधीच धानाचे पऱ्हे टाकले. मात्र मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातून पाऊस गायब झाला असल्याने धानाच्या पºह्यांवरील ताण वाढला आहे. पावसाअभावी पऱ्हे वाळत चालले आहे. येत्या चार पाच दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून त्यांचे लक्ष चातकासारखे आकाशाकडे लागले आहे.
पºहे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांनी सुरूवातीलाच पऱ्हे टाकले.तर काही शेतकऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे पावसाचा अंदाज बांधत धानाचे पऱ्हे टाकले. मात्र आता पाऊस गायब झाला असल्याने आणि उन्ह तापत असल्याने त्याचा पºह्यांवर परिणाम होत आहे. त्यामुळे सध्या पऱ्हे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
पाऊस सरासरी गाठणार का
हवामान विभागाने यंदा जिल्ह्यात सरासरी १३५० मीमी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र यंदा सुरूवातीलाच पावसाने पाठ फिरविली असल्याने आत्तापर्यंत केवळ १२५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदा पाऊस सरासरी गाठणार की नाही अशी शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पेरणी आणि पºह्यांच्या दृष्टीने सध्या पावसाची गरज आहे. हवामान विभागाने सोमवारपासून दमदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पाऊस झाल्यास निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. मात्र तूर्तास तरी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट नाही.
- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.