कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:36 AM2021-06-09T04:36:23+5:302021-06-09T04:36:23+5:30
सडक अर्जुनी : सध्यातरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. तुम्ही त्यासंबंधित अटी व नियमांचे ...
सडक अर्जुनी : सध्यातरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. तुम्ही त्यासंबंधित अटी व नियमांचे पालन करूनच वागा असे कळकळीचे आवाहन खा. प्रफुल्ल पटेल यांनी कोहमारा येथील ऐरिया ५१ वर आयोजित कार्यकर्ता बैठकीत केले.
कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा जास्त तीव्र होती. त्यामुळे अनेक नागरिकांना सोयी-सुविधा यांच्या अभावामुळे आपले प्राण गमवावे लागले. सध्या कोरोनाची लस आलेली आहे. आपण सर्वांनी कोरोना लस टोचून घ्या अशी कळकळीची सूचनाही प्रफुल्ल पटेल यांनी केली. यावेळी व्यासपीठावर त्यांचे सोबत माजी आमदार राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजू कारेमोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, माजी नगराध्यक्ष देवचंद तरोणे, माजी जि.प. सदस्य रमेश चुऱ्हे, नरेश भेंडारकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार यांंनी केले तर आभार राष्ट्रवादी तालुका महिला अध्यक्षा रजनी गिऱ्हेपुंजे यांनी मानले.