महिलेला ठार करण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:28 AM2021-08-29T04:28:57+5:302021-08-29T04:28:57+5:30
......................... नवऱ्यावर गुन्हा दाखल गोंदिया : शहराच्या शास्त्री वाॅर्डातील गोल्ड सिनेमाजवळ राहणाऱ्या ज्योती घनश्याम नेवारे (३३) यांना त्यांचा पती ...
.........................
नवऱ्यावर गुन्हा दाखल
गोंदिया : शहराच्या शास्त्री वाॅर्डातील गोल्ड सिनेमाजवळ राहणाऱ्या ज्योती घनश्याम नेवारे (३३) यांना त्यांचा पती आरोपी घनश्याम नामदेव नेवारे (३४) यांनी २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता दुसऱ्याची बायको पळून गेली. तूपण पळून जा असे म्हटले असता यासंदर्भात ज्योतीने नवऱ्याला फटकारले असता आरोपीने शिवीगाळ करून बायकोला ठार करण्याची धमकी दिली. यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
.........................
हिस्से वाटणीचा वाद आला चव्हाट्यावर
गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सिव्हिल लाइनच्या रविशंकर वाॅर्डातील आरोपी अखिल खबिद कुरेशी (४०) याने हिस्सा वाटणीतून शकील खबिद कुरेशी (४६) या मोठ्या भावाला २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिली. यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आरोपी अखिल कुरेशीविरुद्ध भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
.......................
विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या
गोंदिया : तालुक्याच्या कामठा येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये राहणाऱ्या रवींद्र भैयालाल धारणे (२२) याने २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कीटकनाशक प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला. कीटकनाशक प्राशन केल्यानंतर घरच्या लोकांनी त्याला उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता उपचार घेत असताना २८ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
.....................
सट्टापट्टी घेणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
गोंदिया : शहर पोलिसांनी सट्टापट्टी घेणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. नंगपुरा मुर्रीच्या ग्रामपंचायतीजवळ राहणाऱ्या राजकुमार साकलचंद जैन हा २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सट्टापट्टी घेत असताना त्याला गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई गोमाजी भांडारकर यांनी अटक केली. त्याच्या जवळून ५२० रुपये रोख व सट्टापट्टीचे साहित्य जप्त करण्यात आले. दुसरी कारवाई उत्कल चौक गौशाला वाॅर्ड गोंदिया येथे करण्यात आली. आरोपी आकाश मुन्ना रावते (२४) याच्याजवळून ६५० रुपये रोख व सट्टापट्टी घेण्याची साहित्य पोलीस शिपाई विकास वेदक यांनी जप्त केले आहे. गोंदिया शहर पोलिसांनी दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र जुगार बंदी कायदा कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
.......................
१४ लिटर महत्त्वाची दारू जप्त
गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चुटीया येथील राजकुमार रामदास उईके (४५) यांच्याकडून २७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता १४ लिटर मोहफुलांची दारू जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत १४०० रुपये सांगितली जाते. ही कारवाई पोलीस शिपाई सुभाष सोनवणे यांनी केली आहे. आरोपीविरुद्ध गोंदिया शहर पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई अन्वये गुन्हा दाखल केला आहे.