मेडिकलमधील डॉक्टरला धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:29 AM2021-04-27T04:29:53+5:302021-04-27T04:29:53+5:30

गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णांच्या कक्षात जाऊन व्हिडिओ कॉल केला. नातेवाइकाला व्हिडिओ कॉलवर त्या डॉक्टरकडे कॅमेरा ...

Threatening the doctor in the medical | मेडिकलमधील डॉक्टरला धमकी

मेडिकलमधील डॉक्टरला धमकी

Next

गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णांच्या कक्षात जाऊन व्हिडिओ कॉल केला. नातेवाइकाला व्हिडिओ कॉलवर त्या डॉक्टरकडे कॅमेरा केल्याने त्यांनी यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसात तक्रार नोंदविली.

२५ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथील कोविड वार्ड क्रमांक ४ येथे डॉ. पिंकी शर्मा ड्युटीवर होत्या. या वार्डात रुग्णांच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही येण्यास परवानगी नसताना आरोपी हा कोविड वार्ड नं. ४ मध्ये आला. त्याने स्वत:च्या फोनवरून दुसऱ्या कुणाला तरी व्हिडिओ कॉल करून तो मोबाईल डॉ. पिंकी शर्मा यांच्याकडे करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्याला डॉक्टरने विचारल्यावर त्याने डॉक्टरला ठार मारण्याची धमकी दिली. रूपाली राजाराम कोतवडेकर (३६) रा. अधिपरिचारिका के.टी.एस रुग्णालय गोंदिया यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८६,१८९,१८८,२६९,५०७ सहकलम १२०,४ महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था अधिनियम २०१० सहकलम १२० महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ करीत आहेत.

Web Title: Threatening the doctor in the medical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.