रेल्वेने दारूची तस्करी करणारे तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:23 AM2021-05-03T04:23:45+5:302021-05-03T04:23:45+5:30
गोंदिया रेल्वे पोलीस ठाणेदार अनिता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार दयानंद निकोडे, ओमप्रकाश सेलोटे, चंद्रकात ...
गोंदिया रेल्वे पोलीस ठाणेदार अनिता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार दयानंद निकोडे, ओमप्रकाश सेलोटे, चंद्रकात भोयर, पोलीस शिपाई अखिलेश राय हे गोंदिया रेल्वे स्टेशन परिसरात व प्लॅटफार्मवर गुन्हेगार वॉच, चेकिंग व गस्त करीत असताना १ मे रोजी सकाळी १० वाजता रेल्वे स्टेशन गोंदियाच्या फलाट क्रमांक ४ वर हावडाकडे जाणारी गाडी क्रमांक ०२५ भुवनेश्वर पूजा स्पेशल एक्स्प्रेसने गोंदिया येथून दारू खरेदी करून परराज्यात दुर्ग येथे विक्रीकरिता एकजण जात असताना त्याला पकडले. लकक राजाबाबू बन्सोड (वय २०) रा. उरला अटल निवास दुर्ग (छत्तीसगड) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून बॅगमधे ९० मिलीचे देशी दारू सेवन स्टार पंच ९६ नग बॉटल बॅगसह दोन हजार ६९६ रुपयांची दारू जप्त करण्यात आली.
याच दरम्यान फलाट क्रमांक ४ वर हावडाकडे जाणारी गाडी क्रमांक ०२७७१ सिंकदराबाद रायपूर एक्स्प्रेसने गोंदिया येथून दारू खरेदी करून दुर्ग येथे विक्री करण्यासाठी आरोपी टुमनलाल राजेंद्र देशलहरे (२७) रा. आयएचडीपी बॉम्बे आवास उरला दुर्ग, जि. दुर्ग, राज्य छत्तीसगड, रमना राव (३५) या दोघांजवळून १८० देशी दारूच्या बाटल्या, किंमत ४ हजार ६८० रूपयांची दारू जप्त करण्यात आली. तिन्ही आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम ६५ ई ६६ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.