रेल्वेने कटून तिघांचा मृत्यू
By admin | Published: May 14, 2017 12:35 AM2017-05-14T00:35:37+5:302017-05-14T00:35:37+5:30
वेगवेगळ्या दोन घटनेत रेल्वेने कटून तिघांचा मृत्यू झाला आहे. एका घटनेत दोन भावंडाचा तर दुसऱ्या घटनेत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वेगवेगळ्या दोन घटनेत रेल्वेने कटून तिघांचा मृत्यू झाला आहे. एका घटनेत दोन भावंडाचा तर दुसऱ्या घटनेत एकाचा मृत्यू झाला. गोंदिया-बालाघाट रेल्वे रूळावर ह्या दोन्ही घटना घडल्या.
नागपूरवरुन गोंदिया येथे मावश बहिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आलेल्या दोन भावांचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास कटंगी गावाजवळ मृत्यू झाला.
मृतांमध्ये उमेश अर्जुन बिजेवार (२३) व रितेश अर्जुन बिजेवार (१८) दोन्ही रा. वानाडोंगरी नागपूर अशी मृतांची नावे आहेत.
नागपूर येथील उमेश आणि रितेश हे दोघेही आपल्या नातेवाईकांकडे स्वागत सभारंभासाठी नागपूरवरुन गोंदियाला आले होते. गोंदिया जवळील अंगूर बगीचा परिसरात सभारंभ आयोजित होता. याच ठिकाणाहून गोंदिया-बालाघाट रेल्वे मार्ग आहे. लग्न सभारंभात सहभागी झाल्यानंतर हे दोघे भाऊ रेल्वे ट्रॅकवर जाऊन बसले. सभारंभाचे ठिकाण रेल्वे ट्रॅकजवळ असल्याने सभारंभातील आवाज सुरु असताना बालाघाट वरून गोंदियाकडे येणाऱ्या गाडीने गुरुवारच्या रात्री १० वाजताच्या सुमारास या दोघांना धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दोघांचेही मृतहेद जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
दुसरी घटना शनिवारच्या सकाळी ९.३० वाजता कटंगी रेल्वे क्रॉसिंग जवळ घडली. कटंगीटोला येथील प्रकाशसिंह दादू तलवार (४२) यांचा रेल्वेने कटून मृत्यू झाला. शिवनगर गोंदिया येथील राखी चंदन भारद्वाज (३८) यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.