गोंदिया जिल्ह्यात विहिरीत पडले तीन चितळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 02:01 PM2020-06-23T14:01:58+5:302020-06-23T14:02:19+5:30
सोंदड वनक्षेत्रातील गिरोला येथील देवराम सुपारे यांचे शेतातील विहिरीत ता. 22 ला पहाटेच्या सुमारास दोन मादी एक नर चितळ विहिरीत पडल्याची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: सडक अर्जुनी तालुक्यातील गिरोला येथे एका विहिरीत तीन चितळ पडल्याची घटना सोमवारी सकाळी पाच वाजता घडली.
वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या सोंदड वनक्षेत्रातील गिरोला येथील देवराम सुपारे यांचे शेतातील विहिरीत ता. 22 ला पहाटेच्या सुमारास दोन मादी एक नर चितळ विहिरीत पडल्याची घटना घडली. यापैकी एका चितळाचे पाय मोडले तर दोन चितळ सुरक्षित होते. त्या दोन्ही चितळांना नजीकच्या जंगलात सोडण्यात आले आहे. त्या जखमी चितळाला नागपूर येथील गोरेवाडा सेंटर येथे ठेवण्यात आले आहे. रात्री पाण्याच्या शोधात किंवा वाघाने केलेल्या हल्ल्यापासून जीव वाचवण्यासाठी हे चितळ धावत सुटले असावेत व विहिरीत पडले असावेत असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.