गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा तीन आकडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 10:18 PM2020-09-02T22:18:11+5:302020-09-02T22:20:21+5:30

गोंदिया जिल्ह्यात ऑगस्ट महिन्या दोन आकडी असलेला कोरोना रुग्ण वाढीचा वेग सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच तीन आकडी झाला आहे

Three figures of corona patient growth in Gondia district | गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा तीन आकडी

गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा तीन आकडी

Next
ठळक मुद्देदोन दिवसात चार बाधितांचा मृत्यू१३७ कोरोना बांधितांची नोंदसंसर्ग वाढतोय झपाट्याने, उपाययोजनांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्या दोन आकडी असलेला कोरोना रुग्ण वाढीचा वेग सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच तीन आकडी झाला आहे. बुधवारी (दि.२) एकाच दिवशी १३७ कोरोना बाधितांची नोंद झाली असून एका बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर दोन दिवसात चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. रुग्ण वाढीचा वेग तीन आकडी झाल्याने जिल्हावासीयांना वेळीच सावध होत काळजी घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर दीड महिन्यात एकही रुग्ण आढळला नाही. मार्च ते जुलै दरम्यान २८८ कोरोना बाधित आढळले होते तर सहा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. मात्र ऑगस्ट महिन्यात यात विक्रमी वाढ झाली. एकट्या ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात ११९४ कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर १६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग दोन आकडी होता. मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच यात वाढ झाली आहे.

कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या संख्येत सुध्दा वाढ होत असल्याने जिल्हा वासीयांची चिंता वाढली आहे. तर ३५ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केल्याने थोडा दिलासा देखील मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६८५ रुग्ण कोरोना पाझिटिव्ह आढळले असून यापैकी १०११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आही. जिल्ह्यात सध्यास्थितीत ६६९ कोरोना एक्टिव्ह रुग्ण आहेत.

गोंदिया शहरात सर्वाधिक रुग्ण
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आता तीन आकडी झाला आहे. तर सर्वाधिक रुग्ण हे गोंदिया शहरातील आहे. आतापर्यंत शहरात ८०० वर कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. बुधवारी सर्वाधिक ८४ कोरोना बाधित रुग्ण हे गोंदिया शहरात आढळले आहे.त्यामुळे संपूर्ण शहरच कोरोनाच्या विळख्यात आले आहे. त्यामुळे शहरवासीयांना विशेष काळजी घेण्याची गरज असून आरोग्य विभागाने दिलेल्या दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.

नगर परिषदेत कोरोनाचा शिरकाव
गोंदिया नगर परिषदेतील दोन कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून बुधवार आणि गुरूवारी (दि.३) नगर परिषद बंद ठेवण्यात आली आहे. मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्या निर्देशानंतर नगर परिषदेच्या इमारतीचे सॅनिटायझेशन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान शहरातील बहुतेक कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला असून यातून आता नगर परिषद सुध्दा सुटलेली नाही.

Web Title: Three figures of corona patient growth in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.