तीन बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 07:46 PM2020-09-01T19:46:49+5:302020-09-01T19:46:49+5:30

62 नवे कोरोना बाधित तर 32 रुग्ण कोरोनातून मुक्त

Three infected patients died during treatment | तीन बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

तीन बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

Next


गोंदिया : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. कोरोना संसर्ग वाढीचा हा वेग सप्टेंबर महिन्यात पहिल्या दिवसालाही कायम आहे. आज तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.62 नवे कोरोना बाधित रुग्ण आजच्या अहवालावरुन आढळले आहे. तर 32 रुग्ण कोरोना या आजारावर मात करुन घरी परतले आहेत.
       
जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने तीन बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 62 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला असून ही महिला गोंदिया तालुक्यातील लोधीटोला (धापेवाडा) येथील आहे. दुसरा रुग्ण गोंदिया येथील न्यू लक्ष्मीनगर येथील रहिवासी असून त्याचे वय 52 वर्ष आहे, तर तिसरा रुग्ण हा सालेकसा तालुक्यातील लटोरी येथील रहिवासी असून त्याचे वय 48 वर्ष आहे.
          
जिल्हयात कोरोना विषाणू संसर्ग झाल्याची शक्यता आहे किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी विषाणू प्रयोगशाळेतून किंवा रॅपिड अँटिजेन चाचणीतून करण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत प्रयोगशाळा चाचणीतून 1239 नमुने आणि रॅपिड अँटिजेन चाचणीतून 356 नमुने असे एकूण 1595 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.
       
आज जे 62 कोरोना बाधित आढळून आले यामध्ये सर्वाधिक 47 रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहे. यामध्ये गोंदिया शहरातील कन्हारटोली-1, कुंभारेनगर-1, मरारटोली-2, गणेशनगर-2, फुलचूर-1, जी.एम.सी.-1, देशबंधू वार्ड-7, कस्तुरबा वार्ड-3, हनुमान नगर-1, सिव्हील लाईन-4, कारंजा-1, गोविंदपूर-1, शास्त्रीवार्ड-3, दुर्गा चौक-3, न्यू लक्ष्मीनगर-2, छोटा गोंदिया-2, पंचायत समिती कॉलनी-2, गंज वार्ड-1, गोंदिया-3, पुनाटोली-2, रामनगर-2, तसेच खमारी व डांगुर्ली येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. 
        
तिरोडा तालुक्यातील संत सज्जन वार्ड-2, शहिद मिश्रा वार्ड-1, पांजरा-1. गोरेगाव तालुक्यातील कटंगी-1, चिचगाव टोला-3. आमगाव तालुक्यातील आमगाव व भोसा येथील प्रत्येकी एक रुग्ण. सालेकसा तालुक्यातील सालेकसा व लटोरी येथील प्रत्येकी दोन रुग्ण. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील धाबेपवनी येथील एक रुग्ण. अशा एकूण 62 रुग्णांचा समावेश आहे. 
     
        
पॉझिटिव्ह आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-796, तिरोडा तालुका-315, गोरेगाव तालुका- 44, आमगाव तालुका-112, सालेकसा तालुका- 50, देवरी तालुका- 48, सडक/अर्जुनी तालुका-68, अर्जुनी /मोरगाव तालुका- 92 आणि बाहेर जिल्हा व राज्यात आढळलेले-23 रुग्ण आहे. असे एकूण 1548 रुग्ण बाधित आढळले आहे. 
    
जिल्हयात कोरोनावर आतापर्यंत 976 रुग्णांनी मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका- 403, तिरोडा तालुका- 256, गोरेगाव तालुका- 33, आमगाव तालुका- 61, सालेकसा तालुका- 40, देवरी तालुका- 41, सडक/अर्जुनी तालुका- 58, अर्जुनी/मोरगाव तालुका- 79 आणि इतर - 5 रुग्णांचा समावेश आहे.
      
जिल्ह्यात कोरोना क्रियाशील रुग्ण संख्या 548 झाली आहे. तालुकानिहाय ते पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका- 381, तिरोडा तालुका- 52, गोरेगाव तालुका-11, आमगाव तालुका- 48, सालेकसा तालुका- 9, देवरी तालुका- 8, सडक/अर्जुनी तालुका- 9, अर्जुनी/मोरगाव तालुका -13 आणि इतर- 17 असे एकूण 548 रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत. त्यापैकी 535 क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात व 13 रुग्ण नागपूर येथे उपचार घेत आहेत. 
       
कोरोना क्रियाशील रुग्णांपैकी 202 रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका - 157, तिरोडा तालुका- 8 ,गोरेगाव तालुका- 00, आमगाव तालुका- 8, सालेकसा तालुका- 3, देवरी तालुका - 00, सडक/अर्जुनी तालुका- 10, अर्जुनी/मोरगाव तालुका- 16 व इतर 00 असे एकूण 202 क्रियाशील रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.
      
 जिल्हयात आतापर्यंत 24 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका- 11, तिरोडा तालुका- 7, आमगांव तालुका- 3, सालेकसा तालुका- 1, सडक/अर्जुनी तालुका-1 व इतर एका रुग्णाचा समावेश आहे.
        
विषाणू प्रयोगशाळा चाचणीतून 1239 नमुने तर रॅपिड ॲन्टीजन चाचणीतून 356 असे एकूण 1595 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे.  कोरोनावर ज्या रूग्णांनी आज मात केली आहे अशा रुग्णांची संख्या 32 आहे. यामध्ये गोंदिया तालुका- 28, आमगांव तालुका- 03 व इतर 1, असे आतापर्यंत एकूण 976 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
     
विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण 17033 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 14984 नमुने निगेटिव्ह आले. तर 1239 नमुने पॉझिटिव्ह आले आहे. 271 नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून 538 नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.  विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात 31 व्यक्ती आणि गृह विलगिकरणात 685 व्यक्ती अशा एकूण 716 व्यक्ती विलगिकरणात आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत 11032 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 10676 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. 356 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
      
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 79 चमू आणि 60 सुपरवायझर 60 कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका- 05, आमगांव तालुका- 14, सालेकसा तालुका- 05, गोरेगाव तालुका- 04, देवरी तालुका- 06, सडक/अर्जुनी- 07, तिरोडा तालुका- 17 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका- 02 असे एकूण 60 कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात आहे. 
        
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खोकला, सर्दी, ताप असलेल्या रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून स्वॅबची चाचणी करावी. तसेच गोंदिया शहरातील नागरिकांनी 8 ठिकाणी सुरु असलेल्या तपासणी केंद्रामध्ये जावून स्वॅबचे नमूने देवून कोरोनाविषयक चाचणी करुन घ्यावी.
       
प्रत्येक नागरिकाने आपल्या आरोग्याची काळजी घेऊन कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. काही आरोग्य विषयक नागरीकांना तक्रारी असल्यास त्यांनी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय महाविद्यालय येथे त्वरील आपली आरोग्य तपासणी करावी. असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. भुषणकुमार रामटेके यांनी केले आहे. 

Web Title: Three infected patients died during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.