११ लाख हडपणाऱ्या लिपिकासह तिघांवर गुन्हा

By admin | Published: April 9, 2015 12:59 AM2015-04-09T00:59:24+5:302015-04-09T00:59:24+5:30

देवरी पंचायत समिती अंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या घरकूल लाभार्थ्यांचे ११ लाख रूपये हडप करणाऱ्या लिपीकासह तिघांवर देवरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Three offenders with 11 lakh grabber scripts | ११ लाख हडपणाऱ्या लिपिकासह तिघांवर गुन्हा

११ लाख हडपणाऱ्या लिपिकासह तिघांवर गुन्हा

Next

गोंदिया : देवरी पंचायत समिती अंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या घरकूल लाभार्थ्यांचे ११ लाख रूपये हडप करणाऱ्या लिपीकासह तिघांवर देवरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
देवरीच्या पंचायत समिती कार्यालयातील लिपीक रेवानंद वामन हाडगे रा. सौंदड याने आरोपी धनलाल बिहारीलाल मडावी रा. रेहडी व तथागत आनंदराव मेश्राम रा. कन्हारपायली या तिघांनी ३३ लाभार्थ्यांच्या घरकुलाची ११ लाख रूपये रक्कम बोगस स्वाक्षरी करून हडपली. या संदर्भात प्रशासकीय प्रदीप फागू बन्सोड यांच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी भादंविच्या कलम ४६८, ४७१, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्या एकावर गुन्हा
चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कोसबी येथील शिवचंद तुळशीराम कुंभरे (३९) हा मंगळवारच्या सायंकाळी ६.३० वाजता दरम्यान आपल्या पत्नीला मद्याच्या धुंदीत सार्वजनिक रस्त्यावर शिविगाळ केली.
यावेळी पेट्रोलिंग करण्यासाठी पोलीस नायक विनायक विठ्ठलाराव अतकर हे गेले असताना त्यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने त्यांना धक्काबुक्की केली.
सदर घटनेसंदर्भात चिचगड पोलिसांनी भादंविच्या कलम ३५३, २९४, ५०४, १८६ मुंबई पोलीस कायदा कलम ११०, ११२, ११७ मुंबई दारूबंदी कायदा कलम ६६ (१) (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
शासकीय जागेवर स्वत:ची दाखविणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
आमगावच्या किडंगीपार येथील अनिलकुमार दसाराम बिसेन व शशांक डोये या दोघांनी १८ फेब्रुवारी रोजी किडंगीपार येथील ३ एकर ७० डिसमील जागा खरेदी केली. त्या जमिनीचे अकृषक आदेश मिळवून सीटी सर्विस आॅफीस गोंदिया यांच्या मंजूरीचे प्लानिंग करून त्या भूखंडात ४९ प्लाट तयार केले. त्यांनी काही प्लाट विक्री केले तर काही वाटणी करून आपल्या नावावर केले. त्यांच्याकडे आता सात प्लाट शिल्लक उरले आहेत.
फिर्यादीच्या नावाची खोटी स्वाक्षरी करून प्लाट व सरकारी जागेचा सात-बारा काढून अनिल बिसेन यांनी ती जागा स्वत:ची असल्याचे दाखवून त्या ठिकाणी फार्म हाऊस बांधले. तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी त्या दोघांवर भादंविच्या कलम ४१९, ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
चौकीदाराला ठार करण्याची धमकी
लग्नाच्या स्वागत समारोहात वाजणारा डिजे रात्र झाल्याने बंद करा असा सल्ला देणाऱ्या चौकीदाराला ठार करण्याची धमकी देणाऱ्या एकावर गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हड्डीटोला छोटा गोंदिया येथील जायस्वाल यांच्या लेआऊटवर लग्नाच्या स्वागत समारोहाचा डिजे वाजत होता. रात्र झाल्याने रात्री ११.३० वाजता दरम्यान चौकीदार शेख महबुब अब्दुल गफ्फार शेख (२५) याने डिजे बंद करण्यास सांगितले.
परंतु आरोपी लल्ला तांबे (२५) व दिनेश तांबे (२७) यांनी डिजे बंद न करता त्याला ठार करण्याची धमकी दिली. सदर घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसात आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Three offenders with 11 lakh grabber scripts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.