तालुक्यातील तीन शाळा होणार डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:02 AM2018-08-23T00:02:40+5:302018-08-23T00:04:24+5:30

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, खासगी शाळांच्या तुलनेत ते कुठेही मागे राहू नये, त्यांना सुद्धा डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी. यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण बिरसी विमानतळच्या वतीने सीएसआर निधी अंतर्गत गोंदिया तालुक्यातील बिरसी, खातिया, कामठा येथील तीन शाळा डिजिटल करण्यात येणार आहे.

Three schools in the taluka will have digital | तालुक्यातील तीन शाळा होणार डिजिटल

तालुक्यातील तीन शाळा होणार डिजिटल

Next
ठळक मुद्देसीएसआर अंतर्गत ४५ लाखांचा निधी : भारतीय विमान प्राधिकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
खातिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, खासगी शाळांच्या तुलनेत ते कुठेही मागे राहू नये, त्यांना सुद्धा डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी. यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण बिरसी विमानतळच्या वतीने सीएसआर निधी अंतर्गत गोंदिया तालुक्यातील बिरसी, खातिया, कामठा येथील तीन शाळाडिजिटल करण्यात येणार आहे. यासाठी प्रती शाळा १५ लाख रुपये याप्रमाणे ४५ लाख रुपयांचा निधी भारतीय विमान प्राधिकरण बिरसी विमानतळातर्फे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
खासगी कंपन्याना सीएसआर अंतर्गत विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जातो. सीएसआर निधीतून प्राप्त होणाऱ्या निधीतून महाराष्टÑात जलयुक्त शिवार अभियानासारखी योजना यशस्वी झाली. याच निधीतून आता पायाभूत व शैक्षणिक सुविधांचा विकास करण्यावर भर दिला जात आहे. भारतीय विमान प्राधिकरणा अंतर्गत बिरसी येथे विमानतळ उभारण्यात आले आहे. या आंतरराष्टÑीय दर्जाच्या विमानतळामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यामुळे भविष्यात रोजगार संधीत सुध्दा वाढ होण्याची शक्यता आहे. याच विमानतळ प्राधिकरणाने आता गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. बिरसी, खातिया, कामठा येथे जिल्हा परिषदेची शाळा असून यात परिसरातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहे.
खासगी शाळांप्रमाणे डिजिटल शिक्षण व त्यासारख्या सुविधा या शाळांमध्ये सध्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी सध्याच्या स्पर्धेच्या युगात मागे असल्याचे चित्र आहे. मात्र हे चित्र बदलण्यासाठी बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे आता पुढाकार घेतला आहे.
सीएसआर अंतर्गत या तिन्ही शाळांना प्रत्येकी १५ लाख रुपये देवून या शाळा डिजिटल करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याची मोठी मदत होणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात उंच भरारी घ्यावी. शहरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठेही मागे राहू नये, यासाठी त्यांना डिजीटल शिक्षण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगिन विकास हाच भारतीय विमान प्राधिकरण बिरसी विमानतळाचा मुख्य उद्देश आहे.
- सचिन बी. खंगारी, बिरसी विमानतळ, संचालक

शिक्षकांना प्रशिक्षण
खातिया येथे जिल्हा परिषद शाळेत कामठा-खातिया-बिरसीच्या सर्व जिल्हा परिषद शिक्षकांना डिजीटल शिक्षणासंबंधी नुकतेच एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. हे शिक्षक विद्यार्थ्यांना डिजिटल अभ्यासक्रमाचे धडे देणार आहेत. त्यामुळे या भागातील विद्यार्थी देखील खासगी शाळांप्रमाणे स्मार्ट होणार आहेत.

Web Title: Three schools in the taluka will have digital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.