दारू तस्करी करणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:09 AM2019-02-17T00:09:17+5:302019-02-17T00:10:21+5:30
गोंदिया-बल्लारशा गाडीतून दारूबंदी असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी करणाºया तिघांना रेल्वे सुरक्षा बलच्या टास्क टीमने पकडले. शुक्रवारी (दि.१५) उपनिरीक्षक विवेक मेश्राम, मुख्य आरक्षक पी. दलाई, आर.रायकवार, आरक्षक पी.एल. पटेल यांनी ही कामगिरी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया-बल्लारशा गाडीतून दारूबंदी असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी करणाºया तिघांना रेल्वे सुरक्षा बलच्या टास्क टीमने पकडले. शुक्रवारी (दि.१५) उपनिरीक्षक विवेक मेश्राम, मुख्य आरक्षक पी. दलाई, आर.रायकवार, आरक्षक पी.एल. पटेल यांनी ही कामगिरी केली.
गोंदिया-बल्लारशा डेमो (गाडी क्र. ७८८२०) गाडीत वेषभूषा बदलून टास्क टीम नजर ठेवून होती. दुपारी १ ते २ वाजता वडसा-नागभीड दरम्यान तीन इसमांवर संशय आल्याने टीमने त्यांची तपासणी केली. यात त्यांनी घातलेल्या जॅकेटमध्ये दारूच्या २१४ बॉटल मिळून आल्या. गडचिरोली- चंद्रपूर येथे तिघे दारू घेऊन जात होते. पकडलेल्या दारूची किंमत १० हजार ७०० रूपये आहे. पोलिसांनी महाराष्टÑ दारू बंदी कायद्याचे कलम ६५ (ई), ८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील परवेजखान मुस्तकीमखान (२७), चंद्रपूर जिल्ह्यातील मोहला ठाण्यांतर्गत गांधी चौकातील राहुल एकनाथ कुमरे (३०) व ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यांतर्गत पारड येथील जयदेव मुकरू दोनाडकर (४५) यांचा समावेश आहे. नफा मिळविण्याच्या दुष्टीने दारूची तस्करी करीत असल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे.