२४ तासात बदलले तीन उपविभागीय अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 06:00 AM2019-09-25T06:00:00+5:302019-09-25T06:00:18+5:30
गोंदियाचे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर राम लंके यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पदभार घेतला. परंतु आता शासनाकडून उपविभागीय अधिकारी म्हणून नागपूरचे उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) यांची नियुक्ती करण्यात आली. २२ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयातून नागपूर विभागाचे उपायुक्त (राजस्व) सुधाकर तेलंग यांनी आदेश काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून राजकीय आणि प्रशासकीय घडामोंडीना वेग आला आहे. असाच काहीसा प्रकार गोंदिया उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बाबतीत घडला. अवघ्या २४ तासात तीन उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि बदली करण्यात आल्याने या सर्व प्रकारामुळे हा सोयीचा अधिकारी आणण्याचा तर प्रयत्न नाही अशी जोरदार चर्चा आहे.
गोंदियाचे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर राम लंके यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पदभार घेतला. परंतु आता शासनाकडून उपविभागीय अधिकारी म्हणून नागपूरचे उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) यांची नियुक्ती करण्यात आली. २२ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयातून नागपूर विभागाचे उपायुक्त (राजस्व) सुधाकर तेलंग यांनी आदेश काढला.
सद्यस्थितीत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. विधानसभा निवडणूक सुव्यवस्थीत पार पडावी हे प्रशासनासमोर एक आव्हान आहे. परंतु उपविभागीय अधिकारी राम लंके यांनी शासनाकडून अनिवार्य केलेले निवडणूक प्रशिक्षण घेतले नाही. त्यामुळे त्यांच्या जागेवर शिरीष पांडे यांना पाठविण्यात येत असल्याची माहिती होती. परंतु पुन्हा आता शिरीष पांडे यांच्या जागी २३ सप्टेंबर रोजी भंडाराच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी वंदना सवरंगपते यांची नियुक्ती करण्यात आली. २२ सप्टेंबरपर्यंत राम लंके होते. त्यात विभागीय आयुक्त कार्यालयाने जावक क्र. ११५५ हे पत्र काढून शिरीष पांडे यांची नियुक्ती केली. दुसºयाच दिवशी पत्र काढून वंदना सवरंगपते यांची नियुक्ती केली. २४ तासात गोंदिया उपविभागीय कार्यालयात तीन उपविभागीय अधिकाऱ्यांची बदली आणि नियुक्ती झाल्याने आचारसंहितेच्या काळात दबावापोटी तर नियुक्तीत बदल केला नाही नाह अशी चर्चा आहे.
शासकीय कर्मचाºयांच्या बदल्या संदर्भात विनियमन व शासकीय कार्य पूर्ण करतांना उशीर झाल्यास अधिनियम २००५ चे कलम ४ (४) व ४ (५) नुसार सदर नियुक्ती फक्त निवडणुकीपर्यंतच मर्यादीत राहील.निवडणूक झाल्यानंतर राम लंके पुन्हा गोंदियाचे उपविभागीय अधिकारी राहतील व वंदना सवरंगपते यांना पुन्हा जुन्याच ठिकाणी पदभार सांभाळावा लागणार असल्याचे बोलल्या जाते.