तीन तालुक्यांत अतिवृष्टी

By admin | Published: August 7, 2016 12:48 AM2016-08-07T00:48:16+5:302016-08-07T00:48:16+5:30

शुक्रवारी दिवसभर आणि रात्रभर झालेल्या पावसाने गोंदिया, तिरोडा आणि सालेकसा या तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली.

Three talukas highway | तीन तालुक्यांत अतिवृष्टी

तीन तालुक्यांत अतिवृष्टी

Next

नागरिकांची तारांबळ : २४ तासांत ५९.४ मि.मी.पाऊस
गोंदिया : शुक्रवारी दिवसभर आणि रात्रभर झालेल्या पावसाने गोंदिया, तिरोडा आणि सालेकसा या तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. शनिवारी पावसाने उसंत घेतली असली अनेक नाल्यांना पूर आल्याने काही मार्ग बंद झाले होते. सकाळी ८ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात ५९.४ मिमी पाऊस झाला आहे.
या पावसामुळे गोंदिया शहरातील काही खोलगट भागातील घरांना पावसाच्या साचलेल्या पाण्याने वेढा दिला. याशिवाय ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांची अंशत: पडझड झाली. मात्र कुठेही जीवित हाणी झाल्याचे वृत्त नाही. गोंदिया शहरात अनेक मुख्य रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यातून वाहने काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती.
१ जून ते ६ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ६३६.१ मि.मी. पाऊस झाला आहे. सकाळी ८ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार गोंदिया तालुक्यातील गंगाझरी मंडळ विभागात ५९ मि.मी., रतनारा मंडळात ९० मि.मी., दासगाव मंडळात ३३ मि.मी., रावणवाडी मंडळात ५० मि.मी., गोंदिया मंडळात १५५ मि.मी., खमारी मंडळात ४८ मि.मी., कामठा मंडळात ६२ मि.मी. असा मिळून गोंदिया तालुक्यात सरासरी ७१ मि.मी. पाऊस पडला.
तिरोडा तालुक्यात परसवाडा मंडळ विभागात ६०.१ मि.मी., तिरोडा मंडळात ९३.७ मि.मी., मुंडीकोटा मंडळात ६२ मि.मी., वडेगाव मंडळात १०३ मि.मी., ठाणेगाव मंडळात ९८.२ मि.मी. पाऊस पडला. सर्व मंडळ मिळून तिरोडा तालुक्यात सरासरी ८३.४ मि.मी. पाऊस पडला आहे. सालेकसा तालुक्यात कावराबांध मंडळ विभागात ९६ मि.मी., सालेकसा मंडळात ६० मि.मी., साकरीटोला मंडळात ५४ मि.मी. असा एकूण सालेकसा तालुक्यात सरासरी ७० मि.मी. पाऊस पडला. या तीनही तालुक्यात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे.
इतर तालुक्यांमध्ये गोरेगाव तालुक्यात सरासरी ५२.८ मिमी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात २८.८ मिमी, देवरी तालुक्यात ३५.३ मिमी, आमगाव तालुक्यात ६०.५ मिमी आणि सडक अर्जुनी तालुक्यात ६१.८ मिमी असा पाऊस पडला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

पुलांवरून वाहतेय पाणी
सालेकसा : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे तालुक्यात अनेक जिल्हा मार्गावरील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहन असल्यामुळे काही गावाचा संपर्क आज दिवसभर तुटून राहीला. पाण्याच्या धोका लक्षात घेता अनेक गावातील लोकांनी गावाबाहेर जाण्याचे टाळले. अनेक दुर्घटनांच्या बातम्या पाहताना, वाचताना व ऐकताना लोकांनी आता येण्या-जाण्यात सावधपणा घेण्याकडे लक्ष देणे सुरू केले आहे. त्यामुळे अनेक नदीनाल्यांना पुर आला तरी लोक धोका पत्करायला मागे पुढे पाहत आले.
आजचा शनिवार काम कामाचा असून सुध्दा तालुका मुख्यालयी अनेक कार्यालयामध्ये शुकशुकाट दिसून आला. कालपासून पडत असलेल्या पावसामुळे सालेकसा-तिरखेडी, सातगाव मार्ग, मक्काटोला-बिजेपार, गोवारीटोला-बाम्हणी, लटोरी-नवेगाव, पानगाव-सोनपुरी, जमाकुडो, कोपालगढ, चौकी, टोयागोंदी, निंबा-पाऊलदौना, पोवारीटोला-चिचटोला नवेगाव-बाम्हणी, सालेकसा-नानव्हा यासह जंगल भागातील अनेक मार्ग बंद झाल्याची माहिती मिळाली आहे. कुआढास नाला, धनेगाव नाला, दलदल कुही नाला, पोवारीटोाल नाला, टोयागोंदी नाला, कोपालगढ नाला, हाजराफाल नाला यांच्यासह पुजारीटोला धरणापासून वाघनदी आणि गल्लीटोला ते नवेगावकडे वाहणारी पूर्वी वाघ नदी दुथडी वाहून जात आहे. यानंतर ही पाऊस सुरूच राहीला तर काही गावामध्ये पुराचे पाणी शिरण्याची शक्यता वाढली आहे. (तालुका प्रतिनिधी)

 

Web Title: Three talukas highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.