रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू; गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2022 01:32 PM2022-06-11T13:32:20+5:302022-06-11T17:59:43+5:30

मृत वाघाचे वय अंदाजे ६- ७ वर्षे असल्याचे सांगण्यात येते. नेमक्या कोणत्या रेल्वेने वाघाला धडक दिली ते कळू शकले नाही. तालुक्यात ६ महिन्यांत वाघाच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे.

tiger found dead near railway track in Gondia district | रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू; गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गावरील घटना

रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू; गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गावरील घटना

googlenewsNext

अर्जुनी- मोरगाव (गोंदिया) : गोंदिया - बल्लारशा रेल्वे मार्गावर कोरंभी राखीव वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक- २६० मध्ये रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१०) रात्री घडली. शनिवारी सकाळी रेल्वे मार्गावर गस्त घालणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली. मृत वाघाचे वय अंदाजे ६- ७ वर्षे असल्याचे सांगण्यात येते. नेमक्या कोणत्या रेल्वेने वाघाला धडक दिली ते कळू शकले नाही.

तालुक्यात वाघाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यापूर्वी कालीमाती जंगल परिसरात वाघाची शिकार उजेडात आली होती. तालुक्यात ६ महिन्यांत वाघाच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. कोरंभी -चारभट्टी देवस्थान मार्गादरम्यान गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्ग आहे. शुक्रवारी (दि.१०) रात्री या मार्गाने धावणाऱ्या रेल्वे गाडीने वाघाला धडक दिली. शनिवारी (दि.११) सकाळी या रेल्वे मार्गाची गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मृत वाघाची माहिती वनविभागाला कळविली. वाघाची कंबर व डाव्या पायाची मांडी तुटलेली आहे. त्याच्या शरीरावर मागील बाजूस खरचटले आहे. वाघाच्या शरीराचे सर्व अवयव शाबूत आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी रात्री गोंदिया-बल्लारशा रेल्वेने झाली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

घटनास्थळी गोंदियाचे उपवनसंरक्षक कुलराजसिंह, नवेगावबांधचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी दादा राऊत, वनपरिक्षेत्राधिकारी श्रावण खोब्रागडे, मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे, क्षेत्र सहायक वासुदेव वेलतुरे, उमेश गोटेफोडे, वनरक्षक प्रियंका राऊत व वनकर्मचारी उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत वाघाचे शवविच्छेदन झाले नव्हते.

Web Title: tiger found dead near railway track in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.