व्याघ्र प्रकल्पातील प्रवेश गुप्तधन की शिकारीसाठी ?

By admin | Published: September 24, 2016 01:44 AM2016-09-24T01:44:26+5:302016-09-24T01:44:26+5:30

अलिकडे वाघाच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करताना परवानगीची आवश्यकता असते.

Tiger Reserve access to hunting for hunting? | व्याघ्र प्रकल्पातील प्रवेश गुप्तधन की शिकारीसाठी ?

व्याघ्र प्रकल्पातील प्रवेश गुप्तधन की शिकारीसाठी ?

Next

अर्जुनी-मोरगाव : अलिकडे वाघाच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करताना परवानगीची आवश्यकता असते. व्याघ्र प्रकल्प निर्मितीनंतर जंगलात प्रवेश करणे हा संवेदनशील मुद्दा झाला आहे. अशातच विनापरवानगीने शस्त्रांसह व्याघ्र प्रकल्पाच्या संवेदनशील क्षेत्रात काही लोक आढळून आल्याने वन्यप्राण्याची शिकार करण्याचा उद्देशाने हा प्रवेश तर नव्हता ना? यादृष्टीने वनविभागातर्फे तपास सुरू आहे.
या प्रकरणात मध्यप्रदेशच्या हौशंगाबाद येथील किसनलाल प्रभाकर टेंभरे हा खरा सूत्रधार आहे. शालीकराम गजबे यांच्याशी या कथित किसनलाल बाबाचे जुने संबंध होते. बाबा नेहमी इकडे-तिकडे या पद्धतीची कामे करीत होता. तो पिंडकेपार (साकोली) परिसरात आला असताना सर्वप्रथम या आरोपीपैकी त्याची ओळख करण शालीराम गजबे यांच्याशी ओळख झाली. आरोपीपैकी ४ ते ५ इसम हे मटक्याचे शौकीन आहेत. ते एक दिवस बाबाकडे गेले. त्यांनी बाबांचे काही चमत्कार ऐकले होते. त्यामुळे बाबा चमत्कारीक आहेत अशी त्यांची समजूत होती. येलोडीच्या जंगलात काहीतरी आहे असे बाबांनी सांगितले. यासाठी पायाळू व्यक्ती लागतो अशी बतावनी करण्यात आली. त्यानंतर हा मोठा प्लॉन तयार करण्यात आला. यात परिसरातीलाच ५ ते ६ लोक जुळली. मनोजकुमार घोरमारे हा नागपुरवरुन आला. यासाठी २० सप्टेंबरचा मूहूर्त ठरला. बाबा, करण व इतर लोकं नवेगावबांधला आली व नंतर घटनास्थळी पोहोचले. खड्ड्याचे खोदकाम करीत असताना वनकर्मचाऱ्यांनी छापा घातला.
खड्डा खोदून पैसे शोधले असे आरोपी सांगू लागले.वनकर्मचाऱ्यांनी आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. व्याघ्र प्रकल्पाचा संवेदनशील क्षेत्र असल्याने वाघाच्या शिकारीसाठी तर एकत्र आले नाहीत ना? या दृष्टीने वनविभागाचा तपास सुरु आहे. व्याघ्र प्रकल्प निर्मितीनंतर हे क्षेत्र अधिक संवेदनशील झाले आहे. मात्र ग्रामीण जनता पुर्वीॅसारखीच जंगलात वावरतात. वाघ अदूश्यतेचे प्रमाण वाढल्यानंतर वनविभाग अधिक सजग झाले आहे. ग्रामीणांनी व्याघ्र प्रकल्पाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करने गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Tiger Reserve access to hunting for hunting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.