टिल्लू पंपामुळे पाणी मिळणे झाले कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:35 AM2021-02-17T04:35:19+5:302021-02-17T04:35:19+5:30
आमगाव : स्थानिक नगरपरिषद प्रभागातील पाणीपुरवठा करणाऱ्या नळ योजनेवर काही व्यक्ती टिल्लू पंप लावून पाणी खेचत आहे. त्यामुळे इतर ...
आमगाव : स्थानिक नगरपरिषद प्रभागातील पाणीपुरवठा करणाऱ्या नळ योजनेवर काही व्यक्ती टिल्लू पंप लावून पाणी खेचत आहे. त्यामुळे इतर ग्राहकांना मिळणे कठीण झाले. मात्र, टिल्लू पंप लावून पाणी खेचणाऱ्यांवर अद्यापही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शहरवासीयांची समस्या कायम आहे.
आमगाव नगर परिषद क्षेत्रातील विविध भागांत पाणीपुरवठा योजना आहे. पण ही योजना आधीच जीर्ण असल्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. त्यातत आता टिल्लू पंप लावणाऱ्यांनी या समस्येत आणखी वाढ झाली आहे. नगर परिषद परिक्षेत्रातील विविध प्रभागांत लाखो लिटर पाण्याची गरज आहे. परंतु पाणीपुरवठ्यासाठी लागणारे नियोजन नसल्यामुळे पाणीसाठा वाढवून नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देता येत नाही. त्यातच जलवाहिनीतून काही काही व्यक्ती टिल्लू पंप लावून पाणी वळवत आहे. त्यामुळे इतर नागरिकांना पाणी मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. नगर प्रशासनाने योग्य कार्यवाही करणे गरजेचे आहे. परंतु अद्यापही कुठलीही कारवाई न करण्यात आल्याने शहरवासीयांची समस्या कायम आहे.
......
टिल्लू पंप लावणारे बिनधास्त
पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनीत टिल्लू पंप लावून इतरांच्या वाट्यातील पाणी आपल्याकडेच वळवून घेत आहे. त्यामुळे नियमित पैसे भरणाऱ्या ग्राहकांना पाणी मिळण्यापासून वंचित रहावे लागत आहे पण त्यांच्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याने टिल्लू पंप लावणारे बिनधास्त असल्याचे चित्र आहे.