कृषी केंद्रांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:30 AM2021-05-26T04:30:01+5:302021-05-26T04:30:01+5:30

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्वाचा असून कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठा केंद्र चालू ठेवणेबाबत तसेच ...

Time to agricultural centers from 7 am to 7 pm | कृषी केंद्रांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतची वेळ

कृषी केंद्रांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतची वेळ

Next

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्वाचा असून कोविड-१९ च्या

पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठा केंद्र चालू ठेवणेबाबत तसेच कृषी साहित्याच्या अडथळारहीत पुरवठ्याबाबत

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारीत केले आहे. त्यानुसार सर्वप्रकारची कृषी सेवा केंद्रे, कृषी संबंधित

साहित्य-अवजारे विक्री केंद्र, बि-बियाणे, किटकनाशके, खते विक्री केंद्र व कृषी संबंधित असलेली सर्वप्रकारची प्रतिष्ठानांना

यापुढे सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीमध्ये विक्री करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

मात्र येथे काम करणाऱ्या सर्व कामगार-कर्मचाऱ्यांना कोविडची आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे.

सर्वप्रकारच्या कृषी उत्पादन व साहित्याचा पुरवठा हा नियमितपणे चालू राहील तसेच कृषी संबंधित साहित्य व

उत्पादनांच्या मालवाहतुकीकरीता निर्बंध लागू असणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी लॉकडाऊन जोपर्यंत

अस्तित्वात आहे तोपर्यंत लागू राहील. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावर अनावश्यक गर्दी टाळण्याकरीता समुहाने शेतकऱ्यांची मागणी घेऊन त्या समुहापैकी एकाच शेतकऱ्याने विक्री केंद्रावर जाऊन सर्वांसाठी खते-बियाणे विकत घेऊन बांधावर पोहोच करण्याची मोहीम कृषी विभागाच्या समन्वयाने राबवावी असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

गणेश घोरपडे यांनी कळविले आहे.

Web Title: Time to agricultural centers from 7 am to 7 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.