वेळीच उपचार केल्यास मलेरिया बरा होतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 08:31 PM2019-08-29T20:31:37+5:302019-08-29T20:32:51+5:30
मलेरिया हा आजार देशातील पाच देशांत आढळत असून त्यात भारत एक देश आहे.यामुळे मलेरिया आपल्या देशात किती मोठी समस्या आहे हे कळते. मात्र यापासून घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण वेळीच उपचार केल्यास मलेरिया बरा होऊ शकतो असे प्रतिपादन बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप गुजर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मलेरिया हा आजार देशातील पाच देशांत आढळत असून त्यात भारत एक देश आहे.यामुळे मलेरिया आपल्या देशात किती मोठी समस्या आहे हे कळते. मात्र यापासून घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण वेळीच उपचार केल्यास मलेरिया बरा होऊ शकतो असे प्रतिपादन बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप गुजर यांनी केले.
येथील जिल्हा परिषद कार्यालयात आयोजित ‘किटकजन्य आजारांवर उपाय व नियंत्रण’ या विषयावर आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.डी.निमगडे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांच्यासह अन्य उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. गुजर यांनी, वेगवेगळ््या स्थितीमध्ये जसे गरोदर स्त्री, पाच वर्षाखालील बालक, एचआयव्ही-टीबीने बाधित रूग्ण अथवा मलेरिया बाधीत नसलेल्या देशातून भारतात येणारा प्रवासी यांना मलेरिया होऊ नये यासाठी अथवा झाल्यास काय व कशी उपाययोजना करावी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत डॉ. गुजर यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन डॉ. निमगडे यांनी सत्कार केला. अभार डॉ. चौरागडे यांनी मानले.कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय पर्यवेक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.