तंबाखूविरोधी कार्यक्र म राबवा
By Admin | Published: August 1, 2016 12:05 AM2016-08-01T00:05:42+5:302016-08-01T00:05:42+5:30
तंबाखुमुळे शरिरावर दुष्परिणाम होतात. सोबतच कर्करोग होण्याची शक्यताही असते.
गोंदिया : तंबाखुमुळे शरिरावर दुष्परिणाम होतात. सोबतच कर्करोग होण्याची शक्यताही असते. शाळा परिसरातील दुकाने, पानटपरी, हॉटेल्समधून तंबाखूची विक्री होणार नाही याकडे विशेष लक्ष दयावे. विद्यार्थी आणि लोकांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांची जाणीव करण्यासाठी तंबाखुविरोधी कार्यक्र म राबवावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्याअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सभेला समितीचे सदस्य जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, सदस्य सचिव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, सदस्य अन्न सुरक्षा अधिकारी ए.डी.राऊत, विक्रीकर उपायुक्त शिला मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील, उपशिक्षणाधिकारी राजन घरडे, आरोग्य विभागाचे डॉ.पटले, डॉ.एन.एन.येडे, डॉ.मनीष बत्रा, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा.बबन मेश्राम, आकृती थिंक टूडेचे प्रमोद गुडथे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. सुयर्वंशी यांनी, गुडाखू व चैनीखैनीच्या उत्पादक कंपन्यांवर अन्न औषध प्रशासनाने धाड मारावी. तसेच या विभागाने दररोज दहा ठिकाणी धाडी मारु न संबंधित वस्तुंची तपासणी करावी. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंबाखू विरोधी कार्यक्र मात सहभाग करून घ्यावे असे सांगीतले.
तसेच जिल्ह्यातील पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळांमधून तंबाखूविरोधी कार्यक्रम राबवावे. विद्यार्थ्यांच्या घरी कोण तंबाखू, बिडी, सिगारेट, गुडाखू खातात याची माहिती संकलीत करावी. शिक्षक व मुख्याध्यापकांनी सुद्धा शाळांमध्ये तंबाखू खाणे व धुम्रपानावर बंदी घालावी तसेच तंबाखूमुक्त शाळा ही संकल्पना जिल्ह्यात राबवावी असेही जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी सांगीतले. (शहर प्रतिनिधी)