जिल्ह्यात आज ३६९ दुर्गामूर्तीचे विसर्जन
By admin | Published: October 11, 2016 12:38 AM2016-10-11T00:38:40+5:302016-10-11T00:38:40+5:30
गणपती उत्सवासारखेच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रमाणात ्रगोंदिया जिल्ह्यात दुर्गा उत्सव साजरा केला
उत्सवाची १३ ला होणार सांगता : जिल्हाभरात ५४७ दुर्गा मंडळांनी केली होती स्थापना
गोंदिया : गणपती उत्सवासारखेच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रमाणात ्रगोंदिया जिल्ह्यात दुर्गा उत्सव साजरा केला जातो. गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या या उत्सवाची सांगता करीत घट आणि दुर्गामूर्तींचे विसर्जन सुरू झाले आहे. मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी सर्वाधिक ३६९ मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात विविध ठिकाणाच्या सार्वजनिक मंडळांनी ५४७ दुर्गामूर्तीची स्थापना केली होती. रविवार ९ आॅक्टोबरच्या रात्रीपासून दुर्गामूर्तींच्या विसर्जनाला सुरूवात झाली. त्यात ६ मूर्तीचे विसर्जन रविवारी, १०१ मूर्तीचे सोमवारी तर मंगळवारी (दि. ११) सर्वाधिक ३६९ मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. त्यात गोंदिया शहर ३६, रामनगर २०, गोंदिया ग्रामीण ३६, रावणवाडी ४०, तिरोडा १६, गंगाझरी ३१, दवनीवाडा २६, आमगाव ४६, गोरेगाव ३२, सालेकसा ४९, देवरी ४, चिचगड ५, डुग्गीपार १४, अर्जुनी-मोरगाव १०, नवेगावबांध १, केशोरी ३ ठिकाणी दुर्गा विसर्जन मिरवणुका निघणार आहेत.
१२ आॅक्टोबर रोजी गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत १, रामनगर १, गोंदिया ग्रामीण ४, रावणवाडी ८, गंगाझरी ८, दवनीवाडा ८, आमगाव ३, गोरेगाव ३, सालेकसा ७, देवरी ४, चिचगड २, डुग्गीपार २, अर्जुनी-मोरगाव ११, नवेगावबांध १ तर केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत ३ मूर्तींचे विसर्जन होणार आहे. याशिवाय १३ आॅक्टोबर रोजी रावणवाडी २, तिरोडा १, दवनीवाडा १, डुग्गीपार १, अशा पाच मृर्ती विसर्जन करण्यात येणार आहेत. शारदा मूर्ती १७ आॅक्टोबरपर्यंत विसर्जित होणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)
६२ ठिकाणी रावणदहन
४मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी जिल्ह्यात ६२ ठिकाणी रावणदहन करण्यात येणार आहे. त्यात गोंदिया शहर ३, रामनगर १, गोंदिया ग्रामीण २, रावणवाडी ७, तिरोडा २, गंगाझरी ३, दवनीवाडा निरंक, आमगाव १, गोरेगाव ४, सालेकसा २, देवरी २, चिचगड ८, डुग्गीपार १६, अर्जुनी-मोरगाव ७, नवेगावबांध १ तर केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत ३ ठिकाणी रावनदहन करण्यात येणार आहे.
८८ ठिकाणी आज धम्मचक्र प्रवर्तन दिन
४ डॉ.बाबासाहेबांनी नागपूरच्या ऐतिहासिक भूमिवर दिलेल्या धम्मदीक्षा सोहळ्याची आठवण म्हणून दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी जिल्ह्यात अनेक ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. यावर्षी ८८ ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे.
४ गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ ठिकाणी, गोंदिया ग्रामीण १०, रावणवाडी ४, तिरोडा ६, गंगाझरी ७, दवनीवाडा ६, आमगाव १, गोरेगाव ८, सालेकसा ६, देवरी ७, चिचगड ४, डुग्गीपार ९, अर्जुनी-मोरगाव १० तर केशोरी ठाण्यांतर्गत ७ ठिकाणी हे कार्यक्रम आयोजत केले आहेत.
अशी केली सुरक्षा व्यवस्था
४दुर्गा विसर्जन करण्याची ठराविक वेळ नसल्याने किंवा रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात येत असल्यामुळे विसर्जनस्थळी पाण्यामुळे कोणताही अपघात होऊ नये यासाठी कठडे लावण्यात आले आहेत. सोबतच प्रत्येक मंडळांकडून विसर्जनाची संभावित वेळ घेऊन त्यावेळी बंदोबस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. रात्रीची वेळ असल्याने लाईटची व्यवस्थाही करण्यात आली आहे. खोल पाण्यात जाऊ नका, अश्या सूचनाही मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. गोंदिया शहरातील दुर्गा महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील बाघ नदीच्या कोरणी घाटावर विसर्जनासाठी जात असल्याने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे.
निर्माल्य दानातूृन टाळली पर्यावरणाची हानी
४पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी दुर्गा उत्सवादरम्यान भाविकांनी वाहिलेले पुजेचे साहित्य, फूल मूर्तीसोबत पाण्यात विसर्जित केल्यास तेथील पाणी प्रदुषित होते. पर्यायाने पर्यावरणाची हाणी होते. हे टाळण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग, वनविभागाच्या वतीने सोमवारी निर्माल्य रथ फिरविण्यात आला. यासाठी लागवड अधिकारी युवराज कुंभलकर, नर्मदा सेवा संस्थेचे माधव गारसे, स्वामी विवेकानंद हायस्कूल कारंजाच्या राष्ट्रीय हरित सेनेचे प्रभारी शिक्षक बिसेन आदींनी पुढाकार घेतला. निर्माल्य रथ शहरात विविध ठिकाणी फिरवून निर्माल्य गोळा करण्यात आले. ते सामाजिक वनीकरण विभागाच्या तिरोडा मार्गावरील रोपवाटिकेच्या जागेत टाकण्यात आले.