आज शाळेचा पहिला ठोका नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:00 AM2020-06-26T05:00:00+5:302020-06-26T05:00:52+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही राज्यात उद्योेगधंदे व दैनंदिन व्यवहार मोकळे करण्यात आल्याने शाळांसाठीही शिथिलता देण्यात आली असून १ जुलैपासून यंदा नवीन शैक्षणिक सत्राची सुरूवात करण्याचा मुहूर्त निघाला आहे. यांतर्गत, १ जुलै रोजी उच्च माध्यमिक अंतर्गत वर्ग ९, १० व १२ यांचा ठोका वाजणार आहे. १ ऑगस्ट रोजी माध्यमिक अंतर्गत वर्ग ६ ते ८ तर प्राथमिक अंतर्गत वर्ग ३ ते ५ चा ठोका १ सप्टेंबर रोजी वाजणार आहे.

Today is not the first day of school | आज शाळेचा पहिला ठोका नाहीच

आज शाळेचा पहिला ठोका नाहीच

Next
ठळक मुद्दे१ जुलैपासून उच्च माध्यमिक शाळा सुरू होणार : शाळा सुरू होण्याचा संभ्रम दूर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शाळा २६ जून की १ ऑगस्टनंतर सुरू होणार याबाबत असलेला संभ्रम आता सुटलेला आहे. यात शिक्षण विभागाने १ जुलैपासून उच्च माध्यमिक, १ ऑगस्टपासून माध्यमिक तर १ सप्टेंबरपासून प्राथमिकचे वर्ग सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. यामुळे २६ जून रोजी शाळेचा ठोका वाजणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
दरवर्षी २६ जून रोजी नवीन शैक्षणिक सत्राला सुरूवात होत असून शाळेचा पहिला ठोका २६ जून रोजीच वाजतो. यंदा मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील शैक्षणिक सत्रातील शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षांपासून ते आता नवीन शैक्षणिक सत्र सुरू करण्याबाबत दररोज नवनवे निष्कर्ष लावले जात होते. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे बघत आता शाळा कधी सुरू होतील हा निर्णय घेणे कठीण वाटत असल्याने शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सवय लागावी यासाठी मोबाईलच्या माध्यमातून तशी तयारीही सुरू केली आहे.
मात्र हे सर्व होत असतानाच राज्य शासनाकडून एक तर केंद्र शासनाकडून एक अशा वेगवेगळ््या घोषणा केल्या जात होत्या व त्यामध्ये मात्र पालक आणि विद्यार्थी संभ्रमात होते. ज्या भागात कोरोनाचे रूग्ण नाहीत तेथे शाळा सुरू होतील जेथे रूग्ण आढळले त्या भागात ऑनलाईन वर्ग घेतले जातील अशा काहीशा वेगवेगळ््या चर्चा कानी पडत होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही राज्यात उद्योेगधंदे व दैनंदिन व्यवहार मोकळे करण्यात आल्याने शाळांसाठीही शिथिलता देण्यात आली असून १ जुलैपासून यंदा नवीन शैक्षणिक सत्राची सुरूवात करण्याचा मुहूर्त निघाला आहे. यांतर्गत, १ जुलै रोजी उच्च माध्यमिक अंतर्गत वर्ग ९, १० व १२ यांचा ठोका वाजणार आहे. १ ऑगस्ट रोजी माध्यमिक अंतर्गत वर्ग ६ ते ८ तर प्राथमिक अंतर्गत वर्ग ३ ते ५ चा ठोका १ सप्टेंबर रोजी वाजणार आहे.यासाठी शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापन समित्यांना त्यांच्या स्तरावर काय नियोजन करता येईल याबाबत सभा घेऊन अहवाल मागवून घेतला आहे. अशात आता २६ जून रोजी शाळेचा ठोका वाजणार नाही हे स्पष्ट झाले असून १ जुलैपासून शाळा गजबजणार आहेत.

शिक्षकांची ड्यूटी होणार सुरू
शाळेचा ठोका जरी १ जुलै रोजी वाजणार असला तरिही अन्य शैक्षणिक कामे सुरू होणार असल्याने शिक्षकांचे सत्र २६ जूनपासूनच सुरू होणार आहे. शाळा सुरू होणार असल्याने पूर्व तयारी सुरू होते व त्यात कित्येक कामे अगोदरच करून ठेवायची असतात. अशात शिक्षकांना २६ जून पासून शाळेत रूजू व्हायचे असून ती सर्व कामे करावयाची आहेत.

वर्ग १ व २ चा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडे
नवीन शैक्षणिक सत्राचा मुहूर्त ठरवून त्याचे नियोजन करण्यात आले असतानाच फक्त वर्ग १ आणि २ चा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. वर्ग १ आणि २ मधील विद्यार्थी एकदमच लहान असून त्यांना फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे आदि गोष्टींचे गांभीर्य समाजविता येणे कठीण आहेत.शिवाय एवढ्या लहान मुलांना संसर्गजन्य आजारांची लागण होण्याचा धोका जास्त असल्याने पालकही त्यांना शाळेत पाठविण्यातबाबत राजी दिसत नाहीत. त्यामुळे आता जिल्हाधिकारी परिस्थिती बघून निर्णय घेतील व त्यानुसार, चिमुकल्यांची शाळा उघडली जाणार आहे.

Web Title: Today is not the first day of school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा